मेंढपाळावर वाघाचा हल्ला : मेंढपाळ गंभीर जखमी tiger attack

tiger attack
tiger attack

सावली (प्रतिनिधी) : मेंढयांना चराईसाठी घेवुन गेलेल्या मेंढपाळावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी बोथली येथे घडली. भिमा घटकी कन्नावार रा. बेंबाळ असे जखमी मेंढपाळाचे नांव असुन त्याच्यावर गडचिरोली येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. Tiger attack on Bhima Ghatki Kannawar

मूल सावली Mul, Saoli तालुक्यात मोठया प्रमाणावर धनगर समाजाचे वास्तव्य आहे, मेंढांचे संगोपण करून त्यापासुन आपली आपल्या कुटुंबियांची उपजिवीका करण्याचे काही कुटुंबियांचे मुख्य साधन आहे. मूल तालुक्यातील बेंबाळ येथील भिमा घटकी कन्नावार हे आपल्या मेंढया सावली तालुक्यातील बोथली परिसरात नेले, शुक्र्रवारी मेंढया चराई करत असतानाच वाघाने मेंढपाळ भिमा कन्नावार यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केला, तर दोन मेंढाही गंभीर जखमी झाल्या असुन 1 मेंढी वाघाने उचलुन नेला, जखमी भिमा कन्नावार यांची आर्थीक परिस्थिती हलाखीची असुन जखमीना आर्थीक मदत करण्याची मागणी बेबाळचे माजी सरपंच मुन्ना कोटगले यांनी क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार, मूल पंचायत समितीचे माजी सभापती चंदु मारगोनवार यांच्याकडे केली आहे.