लोखंडी भांडी वाटप व माता कोपरा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन Distribution of iron utensils

Distribution of iron utensils
Distribution of iron utensils

मूल (प्रतिनिधी) : गरोदर आणि स्तनदा माताच्या शरीरात लोहाची गरज खुप असते त्यामुळे मूल तालुक्यातील जुनासुर्ला ग्राम पंचायत आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद जुनासुर्लाच्या वतिने गरोदार मातानां लोखंडी भांडी वाटप व माता कोपरा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन 17 जुर्ले रोजी दुपारी 12 वाजता प्रतिकार नागरी सहकारी पत संस्थेच्या सभागृहात आयोजीत केला आहे. Iron utensil distribution and Mata Kopra awareness program

कार्यक्रमाचे उद्घाटन मूल पंचायत समितीचे माजी सभापती चंदु मारगोनवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणुन मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी देव घुणावत, एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी निलेश चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समिर थेरे, मूल पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी विनोद वैध, बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर भट्टाचार्य,, डॉ. आचल मेश्राम उपस्थित राहणार आहेत.

शरीरातील सर्व पेशंीना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी रक्ताची गरज असते, गरोदर माता, स्तनदा मात यांना लोहाची गरज जास्त असते, शरीरातील लोह वाढवण्यासाठी लोहाचे भांडे वापरणे हा एक चांगला उपाय आहे, आधुनिकीरणामुळे लोहाचे भांडे स्वयंपाक घरातुन कमी होताना दिसत आहे, यामुळे लोहाच्या भांडाचा वापर मोठया प्रमाणावर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरीकांनी सदर कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जुनासुर्ला ग्राम पंचायतचे सरपंच रणजित समर्थ आणि पदाधिकारी, सदस्य व आरोग्य वर्धिनी उपकेंद्र जुनासुर्ला यांनी केले आहे.