चाकूचा धाक दाखवून सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार torture

torture
torture

आरोपीस अटक

भद्रावती (प्रतिनिधी) : घरी कोणी नसल्याची संधी साधून सासऱ्याने चाकूचा धाक दाखवित २२ वर्षीय सुनेवर अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. पीडितेने पोलिस स्टेशन गाठून सासऱ्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. सदरची घटना भद्रावती Bhadrawati तालुक्यातील माजरी पोलिस ठाण्याअंर्तगत घडली. Majri Police Station

पती आणि दीर रात्रपाळीत कामावर गेले होते. दरम्यान, पीडित महिला, मुले, आजारी सासू तसेच सासरे घरी होते. सासऱ्याने सुनेला घरी एकटी बघून रात्री टीव्हीचा आवाज वाढविला आणि चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत सकाळी तिने पती तसेच दीराला याबाबत माहिती दिली. मात्र, कुटुंबीयांची बदनामी होईल, असे म्हणून गप्प बसण्यास बाध्य केले. दरम्यान, हा प्रकार उघड करू नये यासाठी सासऱ्याकडून धमक्या दिल्या जात असल्याने तिला मानसिक धक्का बसला. अखेर सुनेने मानसिक धक्क्यातून सावरत १५ जुलैला माजरी पोलिसात तक्रार नोंदवली.

आरोपी सासऱ्याविरुद्ध कलम ३७६, ३७६ (२) (फ) भादंवी अन्वये गुन्हा नोंद करून त्याला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सपोनी भोजराज लांजेवार करीत आहे.