धुव्वाधार पाऊस अन् छत्रीचा आधार
मूल (प्रतिनिधी): बेरोजगारीवर मात करून कुटुंबियांचा गाळा सांभाळणाऱ्या फुटपाथ विक्रेत्यांना उन, वारा आणि पाण्यापासुन संरक्षण मिळावे यासाठी क्षेत्राचे आमदार तथा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन छत्रीचे वाटप करण्यात आले होते, नुकत्याच बरसलेल्या पावसात या छत्रीचा मोठा आधार पथ विक्रेत्यांना झाला आहे, याउपक्रमामुळे पथविक्रेत्यांनी नामदार मुनगंटीवारचे आभार मानले आहे. Distribution of umbrellas to street vendors, An initiative of Namdar Mungantiwar
जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसायमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कुशल नेतृत्वात बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीन विकासाचा झंझावात सुरू आहे. मूल तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासुनचा सिंचनाचा प्रश्न गंभीर होता मात्र बंधारे, पुल आणि बंधारे व पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातुन काही प्रमाणात सिंचनाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडुन होत आहे. मूलच्या पुटपाथ वर रोज वेगवेगळे व्यवसाय करून कुटुंबाची उपजिवीका करणाऱ्या व्यवसायीकांना नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी थंड पाण्याची कॅन, आणि छत्रीचे वाटप काही दिवसांपुर्वी करून बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्यामुळे, नुकताच बसलेल्या पावसातही व्यवसायीकांनी छत्रीचा आधार घेत व्यवसाय करीत आहे, नामदार मुनगंटीवार यांच्या या क्रियाशील उपक्रमाचा नागरीकांनी स्वागत करीत असुन फुटपाथ व्यवसायीकांनी नामदार मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.