विज पडून एक महिला ठार तर एक महिला गंभीर जखमी One woman dead, one woman injured

One woman dead, one woman injured
One woman dead, one woman injured

रोवणीचे काम आटोपून घराकडे जात असतानाच विज कोसळली

चिमूर (प्रतिनिधी) : रोवणीचे काम आटोपूर घराकडे निघालेल्या महिलांवर विज कोसळुन एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना चिमूर Chimur तालुक्यातील नेरी Neri जवळील मोखाळा Mokhada शेतशिवरात गुरूवारी सायंकाळी 5.30 वाजता दरम्यान घडली. विजेच्या धक्काने विमल लक्ष्मण पिसे Vimal Laxman Pise वय 70 वर्षे हया जागीच ठार झाल्या तर गिता प्रकाश पिसे Gita Prakash Pise वय 55 वर्षे हया गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलेला उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. One woman was killed and another seriously injured due to lightning

One woman dead, one woman injured1
One woman dead, one woman injured1

चिमूर तालुक्यातील नेरी परिसरातील मोखाळा शेतशिवरात एकनाथ पिसे यांच्या शेतात रोवण्याचे काम सुरू होते त्यांच्या शेतात रोवणी करण्यासाठी अनेक महिला कामाला आल्या होत्या. सायंकाळी 5 वाजता दरम्यान रोवणीची सुट्टी झाली काम आटोपुन घराकडे जाण्यासाठी निघाले असता अचानक ढगांच्या कडकडा सह वीज शेतात कोसळली यात शेतामधुन जात असताना विमल लक्ष्मण पिसे वय 70 वर्षे यांच्यावर वीज कोसळली त्या जागीच ठार झाल्या तर त्यांच्या जवळ असणारी गीता प्रकाश पिसे वय 55 वर्षे ही गंभीर जखमी झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पथविक्रेत्यांना नामदार मुनगंटीवारांची साथ Distribution of umbrellas to street vendors

सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी तसेच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सदर घटनेमुळेे नेरी गावात हळहळ व्यक्त होत आहे महिलेच्या पश्चात एक मुलगा दोन मुली नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे