मनोहर भिडे यांच्याविरोधात मूल पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल Complaint against Sambhaji Bhide

Complaint against Sambhaji Bhide
Complaint against Sambhaji Bhide

विविध सामाजिक संघटनेचा पुढाकार

मूल (प्रतिनिधी) : विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने समाजकंटक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात सोमवारी मूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असुन संभाजी भिडे यांच्यावर कारवाई न केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. severe protest has also been given if no action is taken against Sambhaji Bhide.

महाराष्ट्र हा प्रगतशील पुरोगामी राज्य म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रात सर्व जाती-धर्म व पंथाचे लोक गुण्यागोविंदाने मिसळून राहतात आपल्या राज्याला थोर महापुरुषांचा वारसा लाभलेला आहे, त्यातच महात्मा ज्योतिराव फुले बहुसंख्य लोकांचे आदर्श असून त्यांना मानणारा बहुसंख्य समाज महाराष्ट्रात वास्तव्यास आहे. महाराष्ट्र मध्ये काही दिवसापासून महापुरुषांच्या बदनामीचा जणू ठेकाच घेतल्याप्रमाणे संभाजी भिडे नावाचा माणूस सारखा महापुरुषांबद्दल अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरून सारखं अवमान करीत आहे काही दिवसा अगोदर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी त्यांनी गरड ओकली होती त्यानंतरच आता भारतीय समाज सुधारक राजा मोहन रॉय व महाराष्ट्रात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी अत्यंत खालच्या शब्दांमध्ये आक्षेपार्ह विधाने करुन महापुरुषांचा अवमान केलेला आहे त्यामुळे त्यांना मानणारा महाराष्ट्रातील बहुसंख्य वर्गाच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा काम केल्या जात आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीला व मानसिकतेला लगेच आटोक्यात आणणे गरजेचे आहे. संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी वर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. यावेळी भूमिपुत्र ब्रिगेडचे डॉ. राकेश गावतुरे, समता परिषदेचे प्रा. विजय लोणबल,े ज्येष्ठ नेते प्रा. रामभाऊ महाडोळे, शशिकलाताई गावतुरे, देवराव ढवस, गंगाधर कुनघाळकर, डॉ. पद्माकर लेनगुरे, राकेश मोहूर्ले, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष डेव्हिड खोब्रागड,े मनीष मोहूर्ले, प्रा. गुलाब मोरे, ओमदेव मोहूर्ले, ईश्वर लोणबले, मनोज मोहुर्ले, रोहिदास वाढई, प्रतिक गुरूनूले, पवन गुरूनूले, मंगेश मोहुले, प्रतिक आसमवार यांनी सहभाग नोंदविला.

संभाजी भिडे यांनी देशाबदल आणि महापुरुषाबद्दल अपमानजनक वक्तव्य करून महाराष्ट्रातील तमाम जनतेचे मन दुखविले आहे यामुळे त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून अटक करावी अन्यथा युवा क्रांती संघटनेच्या वतिने तिव्र आंदोलन करू असाा इशारा युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रणित पाल, निखिल वाढई, आकाश येसनकर, निहाल गेडाम, सुधीर वाडगुरे, पिंटू चिमूलवार, अक्षय दुम्मावर, दिनेश खेवले, आशिष गणवीर, हेमंत सोनकर, संदिप भोयर, प्रविण बोबाटे, शुभम टिकले, सोनल आगबतेंवार, पुष्कल बावणे, शुभम निगमडे, संदिप तिकिले, संदेश निमगडे यांनी दिला आहे.