भिषण अपघात एक ठार तर एक जखमी terrible accident killed one

terrible accident killed one
terrible accident killed one

अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार

चौगान (प्रतिनिधी) : ब्रम्हपुरी Bramhpuri येथुन काम आटोपून दुचाकीने चकबोथली (कसर्ला) येथे जात असताना रानबोथली रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 4 वाजता दरम्यान घडली. रामचंद्र पांडुरंग मैंद Ramchandra Maid वय 45 वर्षे रा. चकबोथली (कसर्ला) हेे जागीच ठार झाले तर मोहन रामचंद्र सहारे Mohon Sahareवय 50 वर्षे रा. काटली चक हे गंभीर जखमी झाले आहे. terrible accident killed one

विश्वसनिय सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र पांडुरंग मैंद वय 45 वर्षे रा. चकबोथली (कसर्ला) आणि मोहन रामचंद्र सहारे वय 50 वर्षे रा. काटली चक हे कामानिमीत्य ब्रम्हपुरी येथे गेले होते, काम आटोपून आपल्या गावाकडे दुचाकीने जात असतांना अज्ञात वाहनाने मालडोंगरी ते रानबोथली रस्त्यावर दुचाकीला धडक दिल्याने रामचंद्र मैद हे जागीच मृत्यू झाला, तर मोहन रामचंद्र सहारे हे गंभीर जखमी झाले आहे. सदर मार्गावरून ये-जा करणाऱ्यानी जखमी इसमास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलीसांना दिली. सदर घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.