कृषी विभागाला रिक्त पदांचे ग्रहण vacancies

vacancies
vacancies

१११ गावांचा भार ६ कृषी सहायकावर

सुधाकर दुधे, सावली
तालुक्यातील कृषी कार्यालयाअंतर्गत तब्बल १६ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रिक्त पदांचा फटका शेतकरीच नव्हे, तर कार्यरत अधिकारी, कर्मचान्यांनाही सहन करावा लागत आहे. vacant posts in Agriculture Department

तालुक्यातील कृषी विभागाचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय सुरू करण्यात आले आहे परंतु प्रत्यक्षात गावागावात जाऊन योजनांची माहिती ,प्रचार आणि प्रसार शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या कृषी सहायकांचे अनेक पदे रिक्त असल्याने सावली तालुक्यात दिसुन येत आहे Taluka Agriculture Officer Saoli

तालुका कृषी कार्यालयात एकूण ३३ पदे मंजूर असून, यापैकी कृषी अधिकारी १ व मंडळ कृषी अधिकारी १ नाही, कृषी सहायकांची ६ पदे, लिपिक २, अनुरेखक ३ व शिपाई १, वाहनचालक १, सहायक अधीक्षक १, अशी एकूण १६ पदे सध्या रिक्त आहेत. तालुक्यात या विभागाकडून शेतकऱ्यांसाठी फळबाग योजना, ठिबक सिंचन, शेततळे, पॉलिहाऊस व अन्य अनेक योजना राबविल्या जातात. या विभागामार्फत शासनाकडून वेळोवेळी अनेक सर्वेक्षणाची कामे सुद्धा येथील काही कर्मचाÚयामार्फत केल्या जातात.. याकरिता या विभागात मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे मात्र या कार्यालयाला मंजूर असलेला कर्मचारी वर्ग मिळत नसल्यामुळे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले दैनंदिन कामकाज करून रिक्तपदाचा सुद्धा कारभार पहावा लागत आहे त्यामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शाररिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

रिक्त पदे भरण्याची आवश्यकत: अश्विनी गोडसे Ashwini Godse
रिक्त पदाबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आलेला आहे. कृषी विभागाच्या योजना शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी मनुष्यबळाची गरज असल्याची प्रतिक्रीय सावलीच्या तालुका कृषी अधिकारी अश्विनी गोडसे यांनी दिली.