मासे पकडण्याच्या नादात तरूणाचा तलावात बुडून मृत्यु Youth drowned in lake

Youth drowned in lake
Youth drowned in lake

सिंदेवाही (प्रतिनिधी): तालुक्यातील कच्चेपार Kacchepar येथील तलावात मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. प्रफुल देविदास मेश्राम Praful Meshram वय 34 वर्षे रा. कच्चेपार असे तलावात बुडुन मृत्यु पावलेल्या इसमाचे नांव आहे. Youth drowned in lake

सिंदेवाही Sindewahi तालुक्यातील कच्चेपार येथील प्रफुल देविदास मेश्राम वय 34 वर्षे हा गावाशेजारी असणाÚया गाव तलावात मासे पकडण्यासाठी गेला होता, त्याचे सोबती तलावात मच्छिमारीचे जाळे टाकुन तलावात उतरले व मासे पकडु लागले. प्रफुल हा डाव्या पायाने व डाव्या हाताने अपंग असतानाही तो मासे पकडण्यासाठी तलावाच्या खोल पाण्यात गेल्याने व त्याला पोहता येत नसल्याने तो तलावाचे पाण्यात बुडुन मरण पावला.

मृतकाच्या भावानी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून सिंदेवाही पोलीसांनी मर्ग दाखल करून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात शव नेण्यात आले, पुढील तपास सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस करीत आहेत.