33 गोवंशीय जनावराची गोतस्कराकडुन सुटका Cattle smuggling

Cattle smuggling
Cattle smuggling

मूल पोलीसांची कारवाई

मूल (प्रतिनिधी) : सावली saoli कडुन चंद्रपूरकडे जनावरांना वाहनात कोंबुन नेत असताना मूल पोलीसांनी Mul Police वाहन पकडुन वाहनातील सुमारे 33 जनावरांची सुटका करून लोहारा येथील गोशाळेत पाठविण्यात आले आहे. सदर कारवाई गुरूवारी रात्रौ 3 वाजता दरम्यान केली आहे. 33 animals were rescued and sent to Goshala in Lohara

चंद्रपूर जिल्हयातुन मोठया प्रमाणावर गोवंशीय जनावरांची तस्करी केली जात आहे, दरम्यान गुरूवारी रात्रौच्या दरम्यान ट्रक मध्ये गोवंशीय जनावरांना कोंबुन मूल वरून चंद्रपूरकडे नेत असल्याची गोपनिय माहिती मूल पोलीसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गर्शनाखाली मूल परिसरात नाकाबंदी केली होती दरम्यान सावली वरून मूल मार्ग चंद्रपूर जाणारे ट्रक क्रं. ए पी 29 टी बी 4739 या वाहनाला मूल पोलीसांनी थांबवुन वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात सुमारे 33 गोवशीय जनावरे बैल व गाय आढळुन आल्या, सदर गोवंशीय जनावरांची अंदाजे किंमत 2 लाख 31 हजार तर गुन्हा वापरण्यात आलेल्या ट्रक ची अंदाजे किंमत 20 लाख रूपये असा एकुण 22 लाख 31 हजार रूपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. आरोपीविरूध्द मूल पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. Cattle smuggling

सदर वाहनातुन सुटका केलेल्या 33 जनावरांना लोहारा येथील गोशाळेत पाठविण्यात आले आहे.

पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सतिश बनसोड, पोलीस हवालदार कातकर, चिमाजी, राकेश, शफीक शेख करीत आहे.