ना. मुनगंटीवारांच्याा हस्ते 116 अतिक्रमण धारकांना पट्टयाचे वाटप Allotment of leases to encroachment holders

Namdar Sudhir Mungantiwar
Namdar Sudhir Mungantiwar

नागरीकांनी मानले नामदार मुनगंटीवारांचे आभार

मूल (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासुन महसुल विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून वास्तव्य करीत असलेल्या सुमारे 116 कुटुंबियाना जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्या गुरूवारी जागेचे पट्टे वाटप करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम मूल नगर पालीका आणि महसुल विभागाच्या सयुक्त विद्यमाने मूल येथील स्व. मा. सा. कन्नमवार सभागृहात दुपारी 1 वाजता पार पडणार आहे. Allotment of leases to encroachment holders

मूल नगर पालीका क्षेत्रातील विहीरगांव तलाव परिसरात व ताडाळा मार्गावरील महसुल विभागाच्या खुल्या जागेवर अनेक नागरीक अतिक्रमण करून वास्तव्य करीत आहे, सदर अतिक्रमणधारक मागील अनेक वर्षापासुन जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अतिक्रमीत जागेचे पट्टे मिळावे यासाठी वारंवार विनंती करीत होते. दरम्यान नामदार मुनगंटीवार यांनी सदर मागणीची दखल घेवुन अतिक्रमणधारकाना महसुल विभागाच्या जमिनीचे पट्टे देण्याबाबत प्रशासनाकडुन कार्यवाही करून येत्या 21 सप्टेंबर रोजी मूल नगर पालीका क्षेत्रातील जवळपास 116 कुटुंबियाना जमिनीचे पट्टे वाटप करणार आहेत.

दुपारी 1 वाजता पार पडणाÚया कार्यक्रमाला पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचेसह तालुका आणि जिल्हयातील अधिकारी उपस्थित राहणार असुन सदर कार्यकमाला नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रम आयोजकांनी केले आहे.