नागरीकांना नाहक त्रास
अजित गेडाम, जुनगांव
पोंभुर्णा तालुक्यातील जळगाव ला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रेती भरलेला हायवा ट्रक मधोमध फसल्याने या मार्गावरील वाहतूक रहदारी ठप्प झाली आहे. यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागलात्र Haiva truck full of sand got stuck, traffic stopped
शासकीय, निमशासकीय व खाजगी बांधकामे तालुक्यात मोठया प्रमाणावर सुरू आहे, यामुळे तालुक्यात रेती वाहतुक मोठया प्रमाणावर सुरू आहे, दरम्यान गुरूवारी दुपारी 3 वाजता दरम्यान नांदगांव ते जुनगांव यामार्गावर रेती भरलेला हायवा ट्रक रस्त्याच्या मधोमध फसल्याने रहदारी ठप्प झाली होती. Nandgaon to Junggaon route
गोसेखुर्द धरणाच्या कालव्याचे काम मागील अनेक दिवसांपासुन कासवगतीने सुरू आहे, सदर धरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारानी कोटयवधी रूपयाचा रस्ता फोडल्याने सदरचा प्रसंग घडुन आल्याची चर्चा घटनास्थळावर ऐकायला मिळत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदारावर कुठलेच नियंत्रण ठेवले नसल्यामुळे कंत्राटदारानी मनमर्जीने काम केले आहे. यासाठी अनेकदा शिवसेनेने कंपनीला इशारा दिला आणि रस्ता सुरळीत करून देण्यास निवेदन सुद्धा देण्यात आले मात्र कंत्राटदारानी थातूरमातुर मुरूम टाकून रस्ता सुरू केला आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधीत आधिकारी आणि कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. Gosekhurd Dam