बेरोजगार तरूणाचा आक्रोश मोर्चाने प्रशासनही दणाणले March of unemployed youth

March of unemployed youth
March of unemployed youth

 

युवा का्रंती संघटनेचा पुढाकार: तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

मूल (प्रतिनिधी) : शासनाच्या कंत्राटीकरणांच्या धोरणाविरोधात कंत्राटी पदभरती संदर्भात महाराष्ट्र शासनाने काढलेला जीआर रद्द करण्यात यावा या मागणीकरिता युवा क्रांती बहुउद्देशिय संस्थेने मूल तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढुर्न े तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले. सदर आक्रोश मोर्चाने प्रशासनही दणाणले. March of unemployed youth

स्थानिक मूल (विहरीगांव) येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या पुतळ्याला पुष्पमालाअर्पण करून मोर्चा ची सुरवात झाली. मोर्चात 6 सप्टेंबर २०२३ रोजी कंत्राटी नोकर भरती संदर्भात काढलेला शासन अद्यादेश तात्काळ रद्द करण्यात यावा., राज्यातील ६२००० सरकारी शाळेचे होणारे खाजगीकरण पूर्णपणे रद्द करण्यात यावे., सर्व पदाचा ऑनलाईन परीक्षा भरती ची फी कमी करण्यात यावी, यासह विविध मागण्याचे निवेदन मूल तहसीलदार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविण्यात आले आहे.

यावेळी युवा का्रंती बहुउद्देशिय संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तरूण बेरोजगार, युवक, शाळकरी मुल मुली मोठया संख्येने उपस्थित झाले होते.