सई कापगते आणि स्विहा कुनघाडकर यांची राज्यस्तरावर निवड Selection at State level

Selection at State level
Selection at State level

वजन उचल स्पर्धेत विभागतुन झाली निवड

मूल (प्रतिनिधी) : नागपूर विभागीय शालेय वजन उचल स्पर्धेत मूल येथील सेंट अॅन्स पब्लिक स्कुलच्या सई किशोर कापगते Sai Kishor Kapgate हिने 50 किलो वजन गटात तर स्विहा पुरूषोत्तम कुनघाडकर Swiha Purushottam Kunghadkar हिने 40 किलो वजन गटातुन प्रथम क्रमांक मिळवुन ठाणे येथे होणाÚया राज्यस्तरीय वजन उचल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. Selection at State level

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या विद्यमाने आयोजित नागपूर विभागीय शालेय वजन उचल स्पर्धेत सेंट ॲन्स पब्लिक स्कूल मूल येथील 17 वर्षातील 50 किलो वजन गटात सई किशोर कापगते तर 40 किलो वजन गटात स्विहा पुरुषोत्तम कुनघाडकर हिने प्रथम क्रमांक मिळवून ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वजन उचल स्पर्धेकरिता त्यांची निवड झाली आहे. St. Ann’s Public School

चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत अलिकडेच क्रिडा स्पर्धा पार पडल्या होत्या, दरम्यान सेंट अॅन्स पब्लिक स्कुल या शाळेची चमू वर्धा येथे झालेल्या विभागीय स्पर्धेकरिता जिल्ह्यातून निवडली गेली होती हे विशेष. निवड झालेल्या विद्यार्थींनीचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.