राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यपदी मंगेश पोटवार यांची नियुक्ती Mangesh Potwar as Mul Taluka President of NCP

Mangesh Potwar as Mul Taluka President of NCP
Mangesh Potwar as Mul Taluka President of NCP

मूल (प्रतिनिधी) : नामदार एकनाथ शिंदे यांच्या सरकार मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मूल तालुकाध्यक्षपदी मंगेश पोटवार Mangesh Potwar as Mul Taluka President of NCP यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेनुसार व जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केली असुन रविवारी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. Nationalist Congress Party Ajit Pawar Group Mul Taluka

राज्यात युतीत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रस अजित पवार गटाच्या वतिने रविवारी चंद्रपूर येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, सदर बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे राष्टीय सचिव माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत सदर बैठक पार पडली, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहर जिल्हाध्यक्ष राजिव कक्कड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते विलास नेरकर, गोडपिपरी नगर पंचायतचे नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्रसिंग चंदेल, जेष्ठ नेते आबिद अली उपस्थित होते.

यावेळी मूल येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, तथा विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मंगेश पोटवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या मूल तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती राष्ट्रवादी कॉंग्रसचे राष्टीय अध्यक्ष नामदार अजित पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेनुसार जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

सर्वसामान्य नागरीकांचे प्रलंबित प्रश्न, त्यासोबतच शेतकयांचेही प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे मत नवनियुक्त तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी आपल्या नियुक्तीपर प्रतिक्रिया दिली. मंगेश पोटवार यांच्या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते भोजराज गोवर्धन, गौरव शामकुळे, संदिप मोटघरे, सरपंच सतिश चौधरी, आनंदराव गोहणे, किसन गुरनुले, प्रशांत मेश्राम, रोहीत कामडे, दिपक घोंगडे, संगिता गेडाम यासह अनेकांनी अभिनदन केले.