मूलच्या उमानदीवरील घटना
मूल (प्रतिनिधी): गेल्या 2 दिवसापासुन बेपता असलेल्या एका इसमाचा मूलच्या उमानदीत शुक्रवारी सकाळी 6 वाजता दरम्यान मृत्तदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. चंदु बोरेवार असे मृत्तकाचे नांव आहे. Dead body in Uma river bed
मूल Mul येथील पोलीस स्टेशनच्या मागील भागात राहणारे चंदु बोरेवार Chandu Borewar हे गेल्या 2 दिवसांपासुन बेपत्ता होता, त्याचा शोधाशोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो कुठेही सापडला नाही, दरम्यान शुक्रवारी सकाळी 5 वाजता दरम्यान उमा नदीच्या किणाऱ्यावर त्याचा मृतदेह आढळुन आले. याबाबत जलतरण संघटनेने मूल पोलीस स्टेशनला माहिती दिली. पेालीस तात्काळ घटनास्थळावर पोहचुन पंचनामा केले.
पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. मृत्युचे कारण अजुन तरी कळले नाही.