राष्ट्रवादीच्या दणक्याने मृतकाच्या कुटुंबियांना अडीच लाखाची आर्थीक मदत financial aid

financial aid
financial aid

मूल (प्रतिनिधी) : वाहनचालकाच्या दुर्लक्षामुळे सचिन तिवाडे या वाहन चालकाचा 23 नोव्हेबर रोजी सुरजागड लोह प्रकल्पातील खमनचेरू पार्कींग यार्ड मध्ये अपघाती मृत्यु झाला. मृतकाच्या कुटुंबियांना आर्थीक मदत करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार Mangesh Potwar यांनी केली होती, आंदोलनाच्या धसक्याने कंपनी प्रशासनाने मृतकाच्या कुटुंबियांना अडीच लाखाची आर्थीक मदत केली आहे. NCP Mul

सुरजागड लोह प्रकल्पातील कच्चा माल वाहतुक करण्यासाठी खमनचेरू पार्कींग यार्ड मध्ये वाहन उभे केले जाते, 23 नोव्हेबर रोजी सचिन तिवाडे यांनी आपले वाहन उभे करून नंबर लावुन आराम करीत असताना एका ट्रक ट्रेलरच्या वाहन चालकाच्या दुर्लक्षामुळे अपघात झाला, याअपघातात सचिन तिवाडे या वाहनचालकाचा जागीच मृत्यु झाला. आर्थिकदृष्टया अतिशय गरीब असलेल्या तिवाडे कुटुंबियाचा कर्ता पुरूष अपघात मृत्यु झाल्याने तिवाडे कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली होती, यामुळे मूल तालुक्यातील उश्राळा येथील तिवाडे कुटुंबियांना आर्थीक मदत करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी केली होती अन्यथा मूल तालुक्यातील केळझर येथील मालधक्कावर सुरजागड कंपनीचे वाहने जाऊ देणार नाही असा इशारा कंपनी प्रशासनाला दिला होता, कंपनी प्रशासनाने यांची गंभीर दखल घेत 30 नोव्हेंबर रोजी अहेरी येथे मृतकाच्या कुटुंबियांना बोलावुन, मृत्तकाची पत्नी उषाताई सचिन तिवाडे, वडील प्रभाकर तिवाडे आणि मुलगा आणि मुलगी यांच्याकडे कंपनी प्रशासनाने अडीच लाखाचा धनादेश सुपुर्द केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मूल तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार, उश्राळा येथील सामाजिक कार्यकर्ते लोकनाथ नर्मलवार, स्वच्छतामित्र गौरव शामकुळे उपस्थित होते. Khamancheru Parking Yard

  • कुटुंबियांनी मानले राष्ट्रवादी कॉंगेसच्या पदाधिकाऱ्यांचे आभार
    आर्थीक अडचणीत असताना कोणीही मदत केली नाही मात्र वेळातवेळ काढुन मूूल येथील राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाÚयांनी दोन वेळा अहेरी येथे येवुन प्रशासनाशी चर्चा करून आमच्या कुटुंबियांनी अडीच लाख रूपयाची आर्थीक मदत मिळवुन दिले, अडचणीच्या काळात मदत केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहे अशी प्रतिक्रिया मृतकाची पत्नी उषा तिवाडे यांनी दिली.