शिवाणी वडेट्टीवार कॉंग्रेसच्या लोकसभा उमेदवार? Shivani Wadettiwar

Shivani Wadettiwar
Shivani Wadettiwar

नागरीकांमध्ये कुजबुज

मूल (प्रतिनिधी) : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेची निवडणुक जवळ येत असतानाच आता भाजपासह कॉंग्रेसचे उमेदवार ठरविण्याची वेळ जवळ आली असुन, कॉंगेसच्या संभाव्य उमेदवारांमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या कॉंग्रेसच्या राज्य युवा सरचिटणीस शिवाणी वडेट्टीवार यांच्या नावाची चांगलीच चर्चा सुरू आहे. Shivani Vadettiwar Congress Lok Sabha Candidate

Shivani Wadettiwar1
Shivani Wadettiwar1

चंद्रपूर-वणी-यवतमाळ लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार सुरेश उर्फ बाळु धानोरकर यांचे काही दिवसांपुर्वी निधन झाले. रिक्त झालेल्या जागेवर निवडणुक झालेली नाही, परंतु लोकसभेचा कार्यकाळ जवळजवळ पुर्ण होत असल्याने लोकसभेची निवडणुक 2024 मध्ये पार पडणार आहे, यासाठी भाजपाकडुन राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार हंसराज अहिर Hansraj Ahir  यांच्यासह अनेक मातब्बर नेते निवडणुक लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. तर कॉंग्रेसकडुन माजी खासदार स्व. बाळु धानोरकर यांची अर्धांगिनी वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर Pratibha Dhanorkar  या इच्छुक आहेत, खासदार साहेबांनी नेतृत्व केलेल्या क्षेत्राचा सर्वांगिन विकास करण्याचा विळा उचलण्याची भुमिका त्या घेत लोकसभा निवडणुक लढण्याची त्यांची इच्छा आहे, त्यासोबतच कॉंग्रेसचे काही मातब्बर नेतेही लोकसभा निवडणुक लढण्यास इच्छुक आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासुन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांची कन्या कॉंग्रेसच्या राज्य युवा सरचिटणीस शिवाणी वडेट्टीवार यांच्या नावाची चांगलीच चर्चा सुरू असल्याने कॉंग्रेसच्या काही गटात खळबळ तर काही गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासुन शिवाणी वडेट्टीवार हया पक्ष वाढीसाठी चंद्रपूरसह यवतमाळ, गडचिरोली जिल्हयात दौरा करीत आहेत, सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न, आरोग्याच्या समस्या सुटावे यासाठी आरोग्य शिबीर, वन्यप्राण्याच्या हल्लात दुखापत व मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना आर्थीक मदत, बेरोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘‘त्या’’ पुढाकार घेत आहेत. एकंदरीत त्यांच्या याकार्यामुळे लोकसभेची निवडणुकीची लॉटरी त्यांना लागते की काय अशी चर्चा आता नागरीकांमध्ये सुरू आहे.