बेरोजगारांच्या रोजगारावर नगर पालीकेचे बुलडोझर Bulldozer on the employment of the unemployed

Bulldozer on the employment of the unemployed
Bulldozer on the employment of the unemployed

अतिक्रमण हटवल्याच्या निषेधार्थ व्यवसायीकांचे धरणे

अर्पित वाहाणे 
विशेष प्रतिनिधी : आर्वी तहसील कार्यालयासमोर गेल्या पन्नास वर्षापासुन चर्मकार बांधवाचे फुटपाथ व्यावसाय व्यवस्थीत सुरू असताना नगर पालीकेने कोणतीही पुर्वसुचना न देता अतिक्रमणाच्या नावाखाली नियमबाहय कारवाई केल्याने संबधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून अनुसुचित जाती जमाती प्रतिबंध कायदयांवये गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आर्वीच्या उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फतीने निवेदनातुन केली आहे. Unlawful action in the name of encroachment without notice

Bulldozer on the employment of the unemployed१
Bulldozer on the employment of the unemployed१

गेल्या 50 वर्षापासुन चर्मकार बांधव फुटपाथवर जोडे चप्पल विक्री व चप्पल पॉलीसचा व्यवसाय करून आपले उद्रनिर्वाह करीत आहे. सदर व्यवसायामुळे रहदारीस कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही परंतु आर्वी नगर पालीकेच्या मुख्याधिकाÚयांनी 2 डिसेंबर रोजी व्देष भावनेतुन सदर अतिक्रमण काढले, अतिक्रमण काढताना अतिकमण धारकांना पुर्वसुचना देणे गरजेचे होते परंतु कोणतीही पुर्वसुचना न देता सदर व्यवसाय उध्दवस्त केल्याने लाखो रूपयाचे नुकसान करून त्यांचे संसार उघडयावर आणले आहे. परंतु आर्थिक दृष्टया मागासवर्गी्यांचे दुकाने उध्वस्त केल्यानंतर धनदाडग्या व्यवसाहिकांचे अतिक्रमन न काढता कारवाही थांबवण्यात आल्याने सदर कारवाई व्देष भावनेतुन केल्याची शंका व्यवसायीकांना निर्माण झालेली आहे. Municipal Corporation Arvi

नियमाला डावलुन अतिक्रमण काढणाÚया नगर पालीकेच्या संबधित अधिकाÚयांवर तात्काळ निलबीत करून त्यांचेवर अनु. जाती जमाती कायद्यातर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिरीपाचे मेघराज डोंगरे, शामलाजी मसरे, आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वीचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुंभारे सचिव संदीप सरोदे, भिम टायगर सेना वधा्रचे प्रदिप मेंढे, विनोद पायले, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण मनवर, कमलेश कामडी, बहुजन समाज पार्टी वर्धाचे मनिष चवरे, अमोल रंगारी, सामाजिक कार्यकर्ते राजाराम डोंगरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आर्वीच्या उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फतीने निवेदनातुन केली आहे.