शिवसेना (उबाठा) पक्षात युवकांची इनकमींग सुरूच Shiv Sena (Ubaatha) party

Shiv Sena (Ubaatha) party
Shiv Sena (Ubaatha) party

जिल्हा आणि तालुका प्रमुखांवर युवकांचा विश्वास

मूल (प्रतिनिधी): गेल्या काही महिण्यापासुन मूल तालुक्यातील शेकडो युवकांनी शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश करीत असल्याने होवु घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचारासाठी त्यांचा चांगलाच फायदा होत आहे. जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे, तालुका प्रमुख प्रशांत गट्टुवार यांच्यावर विश्वास ठेवुन युवकांचे जत्रे आता शिवसेनेच्या कार्यालयाकडे वळत आहे. Incoming youth in Shiv Sena party continues

19 एप्रिल रोजी 18 व्या लोकसभेची निवडणुक होऊ घातलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोडावर शिवसेना (उबाठा) पक्षात वेगवेगळया गावातील युवकांची इनकमींग सध्या सुरूच आहे. हिंदु हदयसम्राट, शिवसेना प्रमुख स्व. बा‌ळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेरित होउन तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास ‌‌ठेवून तालुक्यातील अनेकांनी पक्षात प्रवेश केला आहे. मूल, मारोडा, राजोली, डोंगरगांव, केळझर येथील युवकांनी काही दिवसांपुर्वी पक्षप्रवेश केला होता, दरम्यान दोन दिवसापुर्वी मूल तालुक्यातील नलेश्वर येथील शेकडो युवकांनी जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख प्रशांत गट्टुवार यांच्यावर नेतृत्वावर विश्वास ठेवुन प्रवेश केलेला आहे. प्रवेश केलेल्या युवकांच्या गळात मशाल चिन्हाचे दुपट्टे टाकुन स्वागत करण्यात आले. Mul, Maroda, Rajoli, Dongargaon, Kelzar, Naleshwar

शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केलेल्या युवकांचे तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, महेश चौधरी, शहर  प्रमुख आकाश राम, युवा सेना शहर प्रमुख अमित आयलानी, छोटू आगबत्तुनवार यांनी अभिनंदन केले. Sandeep Girhe, Prashant Gattuwar