गळफास घेवुन इसमाची आत्महत्या suicide

Dilip Vasant Kumare
Dilip Vasant Kumare

संगिता गेडाम, मूल
घरून बाहेर गेलेल्या एका इसमाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा चितेगांव येथे घडली. दिलीप वसंत कुमरे वय 48 वर्षे असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नांव आहे.  Dilip Vasant Kumare

मूल तालुक्यातील चितेगाव येथील दिलीप वसंत कुमरे वय 48 वर्षे हा शुक्रवारी घरून निघुन गेला होता, Chitegaon Mul शनिवारी सकाळच्या दरम्यान तो चितेगांव येथील बस स्थानकाजवळ असलेल्या एका झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती गावात मिळताच नागरीकांनी मोठी गर्दी केली. सदर घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशनला देण्यात आली. मूल पोलीसानी पंचनामा करून मृतदेह मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आली.suicide

दिलीप कुमरे हा ट्रक चालक म्हणुन काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.  आत्महत्येच नेमक कारण आजुनतरी कळले नाही. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. Mul Police Station