मातृ-पितृ छत्र हरवलेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली राष्ट्रवादीने NCP took the responsibility of education

NCP initiative
NCP initiative

मूल (प्रतिनिधी): लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवुन कुटुंबाचा गाळा पुढे नेण्यासाठी आंध्रप्रदेशात जात असताना झालेल्या अपघातात आई-वडीलाचे निधन झाले, यामुळे निराधार झालेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आता राष्ट्रवादीने हाती घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी पुढाकार घेऊन तिन वर्षे त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. NCP took the responsibility of education

मूल Mul तालुक्यातील मौजा टेकाडी येथील संजय बालाजी जराते यांचे कुटुंबिय गडचिरोली जिल्हयातील एकोडी येथे राहायला गेले. संजय जराते आणि त्यांची पत्नी शुभांगी जराते हया लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करून आंध्रप्रदेशात मक्का तोडणीच्या कामावर निघाले होते, दरम्यान गावाच्या शेजारीच त्यांचा अपघात झाला. याअपघातात जराते दांपत्य ठार झाले. संजय जराते यांना चेतन आणि यश नावाचे दोन अपत्य असुन चेतन 10 तर यश हा 8 वर्षाचा आहे, आई-वडीलांच्या अचानक जाण्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले, आजी आजोबा म्हातारे आणि त्यातच त्यांच्यावर आता दोन नातवाची जबाबदारी आल्याने तेही मोठया संकटात सापडले होते, मोठा चेतन हा इयत्ता चौथी तर यश हा तिसरी मध्ये शिक्षण घेत आहे. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही म्हातारे आजोबा बालाजी जराते आणि आजी आनंदाबाई जराते यांच्या खांदयाव आली होती, मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाचे औच्छित्य साधुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतिने तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी शैक्षणिक साहित्याची किट आणि रोख रक्कम त्यांना सुर्पुद केली, यासोबतच सलग तिन वर्षे त्यांना शैक्षणिक किट आणि रोख रक्कम देण्याचेही त्यांनी यावेळी जाहिर केले. Taluka President of NCP Mangesh Potwar took the initiative

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मूल शहराध्यक्ष आकाश येसनकर, महिला शहराध्यक्ष धारा मेश्राम, महिला तालुकाध्यक्ष संगीता गेडाम, रोजगार आघाडी अध्यक्ष रजत कुकुडे, वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका अध्यक्ष आनंद गोहणे, युवक तालुकाध्यक्ष रोहीत कामडे, अर्चनाताई सुखदेवे, सुनिल कामडी, भोई समाजाचे अध्यक्ष तुकाराम गोहणे, ईश्वर जराते उपस्थित होते.