प्रियंका नर्मलवार यांची महिला आघाडीच्या जिल्हा सदस्यपदी नियुक्ती BJP

Priyanka Narmalwar
Priyanka Narmalwar

तालुक्यात महिलांमध्ये आनंदाचे वातावरण

संगिता गेडाम, मूल
भारतीय जनतापार्टी चंद्रपूर ग्रामीण जिल्हा महिला आघाडीच्या सदस्यपदी मूल तालुक्यातील उश्राळा येथील सरपंच प्रियंकाताई लोकनाथ नर्मलवार यांची महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदनाताई शेंडे यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे. Priynka  Narmalwar Appointed as district member of Mahila Aghadi

भारतीय जनता पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी घेतलेले, परिश्रम आणि जनसामान्यात भाजपाचे विचार पोहचविण्यासाठी दिलेले योगदान यामुळे प्रियंका लोकनाथ नर्मलवार यांची महिला आघाडीच्या जिल्हा सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष वंदनाताई शेंडे यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे. Vandana Shende

समाजातील प्रलंबित विविध प्रश्न आपण सोडवुन सदर पदाला योग्य न्याय दयाल अशी अपेक्षाही व्यक्त केले आहे. जिल्हा सदस्यपदी निवड केल्याबद्दल राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांचे आभार मानले. सदर नियुक्तीबद्दल मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल चुधरी, आकापूरचे उपसरपंच साहिल येनगंटीवार, उश्राळाचे माजी सरपंच देवानंद नर्मलवार, अरविंद जुमनाके, माजी उपसरपंच सुरेश नेवारे यांनी अभिनंदन केले.