भूमिहीन शेतमजुराची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक
संगिता गेडाम, मूल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत चिचपल्ली जवळील जांभार्ला येथील कविता विजय कुमरे ही राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये प्रथम येते पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. Kavita Kumare
कविताचे प्राथमिक शिक्षण आदिवासी आश्रमशाळा जानाळा येथे व माध्य शिक्षण गोपिकाबाई सांगडा आश्रमशाळा राजुरा येथे झाले. तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज चंद्रपूर येथून पदवीचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कविताने आदिवासी विभागाअंतर्गत नर्सिंग करून ऑरज सिटी हॉस्पिटलमध्ये काम करीत असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. यू- ट्यूबवरील व्हिडीओ बघून कविताने सन २०२० मध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबाद (संभाजीनगर) गाठले. २०२० मध्ये कोरोना लागल्याने तीन महिने क्लास करून वसतिगृहात एकटी राहून अभ्यास केला. तिने २०२० मध्येच एमपीएससीच्या पीएसआय, एसटीआय, एएसओ तिन्ही पदाच्या परीक्षेत प्रथमच प्री-एक्झाम काढली. मात्र शुल्लक मार्काने उपनिरीक्षक पद हुकले. मात्र ती खचली नाही. परत जोमाने अभ्यास करून २०२२ कविताने एसटी प्रवर्गातून राज्यात क्रमांक पटकावला आहे. Selection as Sub-Inspector of Police
गावातील पहिलीच पीएसआय
कविता ही चंद्रपूरजवळील चिचपल्ली नजीकच्या जांभार्ला या खेडेगावातील मुलगी आहे. तिचे आई-वडील भूमिहीन शेतमजूर आहेत. त्यांच्या कष्टाचे चीज करण्याच्या जिद्दीने कविताने सातत्यपूर्ण अभ्यास करून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसनी घातली. कविता ही पीएसआय होणारी जांभार्ला गावातली पहिली मुलगी आहे.
आदिवासी आश्रम शाळेतर्फे कविताचे केले अभिनंदन
मूल तालुक्यातील मौजा जानाळा येथील आदिवासी आश्रम शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या कविता कुमरे हिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतिने कविता कुमरे हिचे अभिनंदन केले आहे.