मूल चंद्रपूर महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची संघर्ष समितीची मागणी Mul-Chandrapur Four-laning of highway

Mul-Chandrapur Four-laning of highway
Mul-Chandrapur Four-laning of highway

माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना दिले निवेदन

मूल (तालुका प्रतिनिधी): मूल-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावरून मोठया प्रमाणावर जड वाहतुक केली जात आहे. अपघाताच्या प्रमाणातही लक्षणिय वाढ होत असल्याने यामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी मूल चंद्रपूर चौपदरीकरण निर्माण संघर्ष समितीने केली आहे. सदर मागणीचे निवेदन माजी मंत्री  शोभाताई फडणवीस यांचेकडे समितीच्या शिष्टमंडळाने आज (5 एप्रिल) रोजी दिले आहे. Shobhatai Fadnavis

Mul-Chandrapur Four-laning of highway1
Mul-Chandrapur Four-laning of highway1

मूल-चंद्रपूर याराष्ट्रीय मार्गावरील वाहतुक मोठया प्रमाणावर वाढलेली आहे, यामहामार्गावरून आंतरराज्यीय वाहतुक सुरू आहे. मोठया प्रमाणावर जड वाहतुकही केली जात आहे, यामुळे हा महामार्ग वर्दळीचा झाला असुन तेवढाच धोकादायकही झालेला आहे. यामहामार्गावर दररोज एक दिवसाआड अपघात होत असुन अनेकांचा नाहक जिव जात आहे. त्यामुळे यामहामार्गाचे चौपदरीकरण होणे आवश्यक आहे. मूल-चंद्रपूर चौपदरीकरण व वन-वे झाल्यास, नागरीकांच्या वेळेची बचत आणि इंधनाची बचत होवुन होणार आहे. मूल-चंद्रपूर महामार्ग ताडोाबा-ंअंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर झोनला लागुन आहे. या रस्त्यावर मोठया प्रमाणावर वन्यजीवाचा वावर असतो, मात्र रस्त्यावर वन्यजीवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न केल्याने, वन्यजीवांचेही अपघाती मृत्यु होत आहे. मूल-चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग तयार करतांना वन्यप्राण्यांचे जिवीतांना धोका निर्माण होवू नये यादृष्टीने हा महामार्ग करतांना, अंडरपासेस करता येवू शकते, वन्यजीव असलेल्या भागातून महामार्ग काढतांना अशा प्रकारचे मार्ग तयार करून नागरीकांची सुविधा आणि वन्यप्राण्यांचे संरक्षण केलेले आहे. त्याच धर्तीवर मूल-चंद्रपूर महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचेकडे मूल-चंद्रपूर चौपदरीकरण निर्माण संघर्ष समितीने केली आहे. Mul-Chandrapur Four-laning of highway

Mul-Chandrapur Four-laning of highway2
Mul-Chandrapur Four-laning of highway2

निवेदन देताना समितीचे अध्यक्ष जिवन कोंतमवार, दिनेश गोयल, राकेश रत्नावार, प्रशांत समर्थ, हिरेन शहा, अमोल बच्चुवार, अविनाश गरपल्लीवार, लवनिश उधवाणी, संजय भुसारी, महेश गाजुलवार, कैलास चलाख, विवेक मुत्यलवार, श्रीकांत बुक्कावार, अरविंद गिरी, शाम उराडे, काजु खोब्रागडे, अतुल गोवर्धन, कुमार दुधे, फुलचंद गोंगले, मनिष येलट्टीवार, राहुल येनप्रेड्डीवार, डेव्हिड खोब्रागडे, विवेक मांदाडे उपस्थित होते.