बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ आज मूल येथे शांती मोर्चा Bodhgaya Mahabodhi Mahavihara

Bodhgaya Mahabodhi Mahavihara
Bodhgaya Mahabodhi Mahavihara

हजारो बौध्द बांधव सहभागी, तहसीलदारांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्विकारले 

मूल (प्रतिनिधी): भारतीय बौध्द महासभा व समस्त बौध्द समाज मूल तालुक्याच्या वतिने बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ गेल्या 31 मार्चपासुन मूल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाच्या नियोजीत जागेवर साखळी उपोषण सुरू होते, आज (4 एप्रिल) मूल तालुक्यातील हजारो बांधवाचा शांती मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयापासुन तहसील कार्यालयावर धडकला, मोर्चेकऱ्यांचे निवेदन मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे यांनी स्विकारले. Mul

Bodhgaya Mahabodhi Mahavihara1
Bodhgaya Mahabodhi Mahavihara1

बुध्दगया येथील महाबोधी विहाराची निर्मीती बौध्द धर्मीय राज्याने केली, त्यावर नियंत्रण व व्यवस्थापन हे हिंदु धर्मियांकडे आहे, बिहार येथील महाबोधी व्यवस्थापन बिहार सरकाचा 1949 बौध्दगया मंदिर कायदा रद्द करण्यात यावा व बौध्दांना त्यांच्या धार्मिक प्रथा व वारसा व्यवस्थापित करण्यासाठी व जनत करण्यासाठी सध्याची बौध्दगया मंदीर व्यवस्थापन समिती रद्द करून ती संपुर्ण बौध्द धर्मियांकडे देण्याव यावे यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन होत असतानाही बिहार सरकार आणि केंद्र सरकार याबाबत कोणतेही चर्चा किंवा पाऊल उचलेले नाही, यामुळे सदर आंदोलनाची तिव्रता दिवसेंदिवस अधिक होत आहे, भारतीय बौध्द महासभा व समस्त बौध्द समाज मूल तालुक्याच्या वतिने 31 मार्च पासुन साखळी उपोषण तर 4 एप्रिल रोजी ताडाळा मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयापासुन तहसील कार्यालयावर शांती मोर्चा काढण्यात आला, मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचताच सभेत रूपांतर झाले, यावेळी भारतीय बौध्द महासभा पुर्वचे संस्कार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश मानकर, संस्कार विभागाच्या महिला उपाध्यक्ष वनमाला रामटेके, भारतीय बौध्द महासभा राजगडच्या अध्यक्ष विशाखा वालदे, खालवसपेठचे अध्यक्ष दिलीप वाळके, सामाजिक कार्यकते मधुकर गेडाम, श्रीकांत देवगडे यांनी मोर्चाला संबोधीत केले. Bihar Government and Central Government

मोर्चाचे प्रास्ताविक अशोक रामटेके यांनी केले, संचालन केशव दुर्गे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जि. एम बांबोळे यांनी मानले. यावेळी तहसीलदार मृदुला मोरे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्विकारले आणि शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. मोर्चात जवळपास 2 हजार बौध्द बांधव सहभागी झाले होते. कोणतीही अनुचित घटना घडु नये यासाठी परि. पोलीस अधिक्षक तथा मूलचे पोलीस निरीक्षक प्रमोद चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चौख ठेवण्यात आला होता. Police arrangement