मूल नगर परिषद नगराध्यक्ष निवडणुक
भोजराज गोवर्धन, मूल
मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष नगरसेवकांची निवडणुक काही दिवसांवर येवुन ठेपली आहे, यापार्श्वभुमीवर मूल येथील भाजपाचे इच्छुक दावेदार माधुरी महेंद्र करकाडे आणि इंजि. शिवाणी संदीप आगडे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. 15 इच्छुक उमेदवारांनी भाजपाकडे उमेदवारी मागीतली आहे, मात्र अद्याप तरी भाजपाकडुन कोणालाही उमेदवारी जाहिर केलेली नाही. Madhuri Karkade, Shivani Aagde
माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार गत 16 वर्षापासुन याक्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत आहेत, त्यांच्या विकासाच्या विजनमुळे मूल नगर परिषदेवर भाजपाची सत्ता आहे, सन 2016 मध्ये पार पडलेल्या मूल नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि नगरसेवकाच्या निवडणुकीत अध्यक्षासह 15 नगरसेवक भाजपाचे निर्वाचीत झाले होते, कॉंग्रेस पक्षाला केवळ 1 नगरसेवक निवडुण आणण्यात यश आले होते. काही दिवसांवर मूल नगर पालीकेच्या अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी निवडणुक होणार आहे, यासाठी भाजपाकडे अध्यक्षपदासाठी 16 तर नगरसेवक पदासाठी 111 इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज भरलेले आहे. Municipal Council Mul
यामध्ये माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उषाताई शेंडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनिषा गांडलेवार, भाजपाचे जेष्ठ नेते, माजी सभापती महेंद्र करकाडे यांची पत्नी माधुरी करकाडे, इंजि. शिवाणी संदीप आगडे, माजी सभापती विद्या बोबाटे, माजी नगरसेविका रेखाताई येरणे, भाजपा महिला आघाडीच्या माजी शहराध्यक्ष प्रा. अर्चना युवराज चावरे, भाजपाचे शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांची पत्नी चेतना मोहुर्ले, प्रा. किरण किशोर कापगते, अॅड. राजश्री राकेश ठाकरे, मनिषा प्रशांत लाडवे यांनी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये मात्र माधुरी करकाडे आणि शिवाणी आगडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसुन येत आहे. यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला जाहिर होईल याबाबत अजुनही साशंक आहे







