नगराध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांमध्ये सुर
भोजराज गोवर्धन, मूल
निवडणुक आयोगाने पुढच्या महिण्यात निवडणुक घेण्याचे निश्चीत केले आहे, त्यादुष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत, नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठी इच्छुकांकडुन आवेदन पत्र सादर करण्याचे आवाहन पक्षाकडुन करण्यात आल्याने अनेकांनी आवेदनपत्र सादर करीत आहेत, परंतु यासर्वच घडामोडीवरून भारतीय जनता पक्षातील इच्छुकांच्या गर्दीवरून जुन्या निष्ठावंताना डावलणार की नवख्यांना संधी देणार अशी चर्चा आता नगराध्यक्ष पदावरून सुरू आहे. Mul Municipal Council Election

मूल नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे नागरीकांच्या मागास प्रवर्ग (महीला) साठी राखीव आहे, आरक्षण जाहीर होताच सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर होता, मात्र काही दिवसामध्ये नाराजी दुर करीत अर्धागिंनीला नगराध्यक्ष बनविण्यासाठी तळमळ सुरू झाली, आणि आता शहरातील महत्वाचे पक्ष कार्यकर्ते, समाजबांधव, परीचीतांची भेटीगाठी घेणे सुरू केलेले आहेत. नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष उषाताई शेंडे, भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मनिषा गांडलेवार, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते माजी सभापती महेंद्र करकाडे यांची अर्धागिनी माधुरी करकाडे, माजी सभापती विद्या बोबाटे, माजी नगरसेवक रेखाताई येरणे, भाजपा महिला आघाडीच्या माजी शहराध्यक्ष प्रा. अर्चना युवराज चावरे, भाजपाचे शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांची अर्धागिनी चेतना मोहुर्ले, प्रा. किरण किशोर कापगते, इंजि. शिवानी संदिप आगडे, अॅड. जयश्री राकेश ठाकरे, मनिषा प्रशांत लाडवे याभाजपाकडुन निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. कॉंग्रेसकडुन शहराध्यक्ष सुनिल शेरकी यांची पत्नी श्वेता शेरकी, तालुकाध्यक्ष गुरूदास गुरनुले यांची पत्नी माधुरी गुरनुले, महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष रागिनी आडपवार इच्छुक आहेत, मूल नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी पत्नी एकता समर्थ यांना भाजपाकडुन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु ऐनवेळी त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते इतर पक्षाचा पाठींबा घेऊन निवडणुक लढवु शकतात, त्यांना मूल शहरात मानणारा वर्ग मोठा आहे हे त्यांची जमेची बाजु आहे, परंतु त्यांनी अजुनही भाजपाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला नाही यामुळे त्यांच्या उमेदवारी बद्दल अजुनही शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडुन शहराध्यक्ष अर्चना चावरे इच्छुक आहेत, आपल्यालाच पक्षाकडुन उमेदवारी मिळावी यासाठी काही इच्छुकांनी वेगवेगळया माध्यमातुन प्रयत्न सुरू आहे. काही इच्छुक तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातुनही प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.BJP, Congress

मूल नगर पालीकेच्या अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनाही रणांगण गाजविण्यास सज्य झाल्याचे दिसुन येत आहे, मूल शहरात मोठया प्रमाणावर कुणबी, तेली आणि माळी हा ओबीसी समाज आहे. यासमाजातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास नगराध्यक्ष निवडणुकीत तो समाज त्याउमेदवाराच्या पाठींशी उभा राहु शकतो, यादृष्टीने उमेदवार निवडतांना सदर समाजाला नेते मंडळी प्राधान्य देवु शकतात अशी चर्चा आता वार्डावार्डात सुरू आहे. मात्र ऐनवेळी ओबीसी मधील अल्पसंख्यात असलेल्या काही उमेदवाराचेही नांव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. Shivsena, rashtravadi congress









