पठाण, गुरनुले मूल नगर पालीकेचे स्विकृत सदस्य? Mul Municipal Council

Pathan & Gurnule
Pathan & Gurnule

कॉग्रेेसच्या गोटात नाराजीचा सुर

भोजराज गोवर्धन, मूल
गेल्या दहा वर्षापासुन मूल नगर परिषदेवर भाजपाची सत्ता होती, त्यानंतर साडेचार वर्षे प्रशासकराज सुरू होता, मात्र 2 डिसेंबर रोजी झालेल्या मूल नगर परिषदेत कॉंग्रेसच्या नगराध्यक्षासह 18 नगरसेवक निर्वाचीत झाले. 7 जानेवारी रोजी स्विकृत नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुलाब पठाण आणि बंडु गुरनुले यांच्या नावाची शिफारस गटनेते राकेश रत्नावार यांनी केल्याची चर्चा आहे. Mul Municipal Council

मूल नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा 7 जानेवारी रोजी नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली आहे. यासभेत उपाध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. 20 सदस्य संख्या असलेल्या मूल नगर पालीकेत कॉंग्रेसचे 18 नगरसेवक तर 2 भाजपाचे नगरसेवक निवडुन आले,
नगर परिषदेत 2 स्विकृत नगरसेवकाची निवड करणे आवश्यक आहे. त्यानुसार बहुमतात असलेल्या कॉंग्रेस पक्षाकडुन अनेक दिवसापासुन स्विकृत नगरसेवकाचे स्वप्न बघुन होते, मात्र कॉंग्रेसकडुन गुलाब पठाण आणि बंडु गुरनुले यांच्या नाव जवळजवळ फायनल केल्याची चर्चा असल्याने बार्सिंग बाधुन असलेल्या काही कॉंग्रेस कार्यकर्ते नाराज झाल्याचे बोलले जात आहे. Pathan & Gurnule

स्वीकृत सदस्याच्या निवडीबाबत काही नगरसेवकाची मते विचारात घेतल्या गेले नसल्याचेही उघड झाले आहे.
नगरपरिषदेच्या पहिल्या बैठकी आधीच फटाके लागत असल्याने राजकीय वर्तुळात स्वीकृत सदस्यांची बाब आता चर्चेचा विषय ठरत आहे

जनसामान्याची इच्छा मी स्विकृत नगरसेवक व्हावा: विजय चिमडयालवार
नगर परिषदेत नगराध्यक्षसह नगरसेवक निवडुन यावे यासाठी मी दिवसरात्र मेहनत घेतली, 21 डिसेंबर रोजीच्या निकालानंतर कॉंग्रेस पक्षाचे 18 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडुन आले, यामुळे जनमानसात आणि माझी सुध्दा इच्छा होती मी स्विकृत सदस्य म्हणुन नगर परिषदेत जावे मात्र कॉग्रेसकडुन माझे नांव पाठविण्यात आलेले नाही अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष विजय चिमडयालवार यांनी दिली. Vijay Chimdyalwar