कारवाई करण्याची सुरज मांदाडे यांची मागणी
मूल (प्रतिनिधी): मूल तालुक्यातील रेतीची मागणी चंद्रपूर जिल्हयासह इतरही जिल्हयात मोठया प्रमाणावर होत आहे. मूल तालुक्यातील कोसंबी आणि चितेगांव घाटावरून काही रेती तस्करांकडुन अवैध उत्खनन होत आहे. यामुळे शासनाचा महसुल बुडत आहे, अवैध रेती उत्खनन बंद करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सुरज मांदाडे यांनी तहसीलदार मूल यांच्याकडे केली आहे. Illegal mining
चंद्रपूर जिल्हयातील मूल तालुक्यातील काही रेती घाटांचा लिलाव शासनाने केलेला आहे, कोसंबी आणि चितेगांव घाटही लिलाव झालेला आहे मात्र काही अवैध रेती चोरटयांनी शासनाचा महसुल बुडवुन अवैध रेती उत्खनन करीत आहे. मात्र महसुल विभागाचे कर्मचारी याकडे डोळेझाक करीत आहे. याबाबत राज्याचे महसुलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुडे, बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि तहसीलदार मूल यांच्याकडे तक्रार करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सुरज मांदाडे यांनी केली आहे. अन्यथा नागरीकांना घेवुन तिव्र आंदोलन करू असा इशारा सुध्दा त्यांनी दिलेला आहे. Suraj Mandale









