राष्ट्रीय महामार्गावरील पोचमार्गाच्या कामात माती व डांबरमिश्रीत चुरीचा वापर national highway

national highway
national highway

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

मूल (प्रतिनिधी) : चंद्रपूर-मूल राष्ट्रीय महामार्गावरील अंधारी नंदीच्या पुलाचे काम मागील 2 वर्षापासुन सुरू आहे. याच पुलाच्या दोन्ही बाजुने पोचमार्ग तयार करण्यात येणार असुन यामार्गाच्या कामात माती आणि डांबरमिश्रीत चुरी टाकण्यात येत असल्याने सदर काम दर्जाहिन होत असल्याची बोंब नागरीकांकडुन होत आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्याप्रती तिव्र रोष व्यक्त केल्या जात आहे. Andhari bridge

चंद्रपूर-गडचिरोली याराष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गडचिरोली ते मूल पर्यंत पुर्ण करण्यात आलेले आहे. मूल ते चंद्रपूर पर्यंतच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच महराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ दिले होते, यासाठी मूल-चंद्रपूर चौपदरीकरण निर्माण संघर्ष समितीने पत्रव्यवहार केलेला होता. यामार्गाचे प्रशासकीय काम शेवटच्या टप्यात असल्याचे समजते, काही महिण्यानी कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे, दरम्यान मूल‘चंद्रपूर मार्गावरील अंधारी पुलाचे काम चंद्रपूर येथील एका कंत्राटदारामार्फत सुरू असुन अंतीम टप्पात आहे, पुलाच्या बाजुला असलेल्या पोचमार्गाचे कामाला कंत्राटदारानी सुरूवात केलेली असुन सदर कामात माती आणि डांबर मिश्रीत चुरी टाकण्यात येत असल्याने कामाच्या दर्जा खालावण्याची शक्यता आहे. सदर परिसरातुन पावसाळयात मोठया प्रमाणावर पाणी वाहुन नदीत जात असते, याठिकाणी मातीचा वापर करीत असल्याने, सदर पोचमार्ग वाहुन जाण्याची किंवा दबण्याची शक्यता असते Mul Chandrapur national highway

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यानी यापोचमार्गाकडे लक्ष देवुन दर्जेदार पोचमार्ग तयार करण्यासाठी मुरूमाचा वापर करण्याची सक्ती कंत्राटदाराला करावे अशी मागणी नागरीक करीत आहे.