मूल तालुक्यातील नांदगांव येथील घटना
मूल (प्रतिनिधी): तेलगणा राज्यातुन रोवणीचे काम आटोपुन परत येत असतांना नांदगांव येथील एका इसमास टाटा पिकअप वाहनाने धडक दिली. याधडकेत टाटा पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होवुन झालेल्या दुर्घटनेत 2 जण ठार तर 13 जण जखमी झाल्याची घटना मूल तालुक्यातील नांदगांव येथे बुधवारी सकाळी 6.30 वाजता दरम्यान घडली. हरीदास मिडपल्लीवार वय 35 वर्षे, वनिता भिकारू मरस्कोल्हे वय 40 वर्षे असे मृतकाचे नांव आहे. तर वाहन चालकाचे नांव अंकुश नागोराव राचलावार वय 28 वर्षे रा. गिरगाव नागभिड असे आहे. Nandgaon Mul
चंद्रपूर जिल्हयातील बेरोजगार युवक, महिला रोजगाराच्या शोधात नेहमीच बाहेर राज्यात जात असतात, दरम्यान सिंदेवाही तालुक्यातील काही मजुर तेलंगणा राज्यात रोवणीच्या कामासाठी गेले होते, काम पुर्ण करून टाटा पिकअप वाहन क्रं. एम एच 34 बी झेड 3127 ने परत येत असतांना मूल तालुक्यातील नांदगांव येथील हरीदास मेडपल्लीवार हे शौचविधी आटोपुन परत जात असतांना त्याला समोरासमोर धडक दिली, यामुळे वाहन चालक अंकुश नागोराव राचलावार वय 28 वर्षे रा. गिरगांव नागभिड यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाली, यामध्ये डोगरहळदी येथील वनिता भिकारू मरसकोल्हे या गंभीर जखमी झाल्या, तर हरीदास मिडपल्लीवार यांना वाहनाची समोरासमोर जोरदार धडक बसल्याने तेही गंभीर जखमी झाले दोघांनाही मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ आणत असतांना दोघांचाही उपचार करण्यापुर्वीच मृत्यु झाला. याअपघातात 1 जण गंभीर जखमी तर 12 जण किरकोळ जखमी झालेले आहे. गंभीर जखमी असलेल्या इसमाला उपचारार्थ चंद्रपूर पाठविण्यात आले. मृतकाची उत्तरीय तपासणी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात करून शव मृतकांच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आले. Mul Police Station
घटनेची माहिती मिळतांच मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल होवुन टाटा पिकअप चालकाला ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. PI Rathod









