नागरी सत्काराप्रसंगी मुनगंटीवारांचे प्रतिपादन
मूल (तालुका प्रतिनिधी) : चंद्रपूर मध्ये मालधक्का आहे परंतु तिथे कोणताही रोजगार नाही, हमालीचा रोजगार पाहिजे असल्यास मालधक्काची गरज नाही, तो आताही मिळतो, याठिकाणी आयर्नचा साठा करून ठेवल्यास मोठी समस्या निर्माण झाली असती, अनेक आजाराना निमंत्रण दिल्या गेले असते, मात्र मूलचे नागरीक जागरूक आहेत, त्यांनी वेळीच विरोध केला, नगराध्यक्ष एकताताई समर्थ यांनी नावाप्रमाणे सर्व नगरसेवकांना एकत्र करून नगर पालीकेत ठराव घेतला, यापुढे मूल शहरामध्ये मालधक्का होवु देणार नाही, त्यामध्ये चंद्रपूरचा च लावुन मूल शहरात मालधक्का ‘होवुच’ देणार नाही असे प्रतिपादन माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ते मालधक्का विरोधी संघर्ष समितीच्या वतिने कन्नमवार सभागृह येथे 31 मे रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजीत केलेल्या नागरी सत्कार संभारंभात बोलत होते. Mul
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल वैरागडे होते. प्रमुख अतिथी म्हणुन मूलच्या प्रथम नागरीक एकता प्रशांत समर्थ, संघर्ष समितीचे जिवन कोंतमवार, नगर पालीकेचे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, समितीचे दिनेश गोयल, अनिल मोगरे, रूपेश मारकवार, नितीन येरोजवार प्रामुख्याने उपस्थित होते. MLA Mungantiwar
यावेळी आमदार मुनगंटीवार बोलतांना पुढे म्हणाले की, मागच्यावेळेसही मालधक्काचा विषय पुढे आला होता, तेव्हा मी सुध्दा म्हणालो, मूलची छेडखानी करू नका हा मतदार संघ स्वर्गीय मा. सा. कन्नमवार यांचा आहे, त्यांचा पक्षविरहीत अभिमान आहे, यामतदार संघात मला त्यांच्या नावाने सभागृह बांधता आल, यापुढेही मी मूल शहराच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहीन, तुम्ही सर्वांनी खुप छान सुरूवात केलेली आहे, तुम्हच्या एकतेला, तुम्हच्या संयुक्त प्रयत्नाला, तुम्हच्या भावनेला, तुम्हच्या या एकत्रित शक्तीला, पुन्हा ही वाढावी यासाठी त्यांनी समिती सदस्यांना शुभेच्छा दिल्या. Marotrav Kannamwar
यावेळी नगराध्यक्ष एकता समर्थ, अनिल मोगरे, विजय सिध्दावार, प्रशांत समर्थ, अॅड. अनिल वैरागडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा मालधक्का विरोधी संघर्ष समितीच्या वतिने सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला, त्यासोबतच मूल व परिसरात 41 संस्था, संघटनेच्या वतिने त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी नगराध्यक्ष एकता समर्थ आणि अॅड. अनिल वैरागडे यांचाही सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. Ekta Samarth
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिवन कोंतमवार यांनी केले, संचालन वर्षा कोल्हे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कुमुद भोयर हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी हिरेन शहा, भोजराज गोवर्धन, अॅड. प्रणव वैरागडे, प्रा. प्रशांत वासाडे, संदिप मोहबे, अॅड. अश्विन पॉलीकर, प्रशांत गट्टुवार, कैलास चलाख, महेश गाजुलवार यांनी अथक परिश्रम घेतले.









