कॉंग्रेस कार्यकर्ते लागले प्रचाराला
मूल (प्रतिनिधी): मूल नगर पालीकेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे मूल तालुक्यातील कॉग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. कॉंग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्ते एकजुटीने नगर पालीका निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकदिलाने काम करण्याची हमी घेतल्याने कॉंग्रेस गोठात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. Congress
राज्यातील नगर पालीका निवडणुकांचे बिगुल वाजले, आणी सर्वच पक्षानी निवडणुक लढविण्यासाठी आपआपल्या परिने प्रयत्न सुरू केलेले आहे. दरम्यान भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते आणी माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी नगर पालीका निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसचे नेते ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून भाजपाला धक्का दिला. यावेळी त्यांनी पत्नी एकता समर्थ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार वडेट्टीवार यांनी एकता प्रशांत समर्थ यांना नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणुन घोषीत केले. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी टाळया वाजवुन त्यांचे स्वागत केले. Vijay Vadettiwar
यावेळी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाÚयांनी एकदिलाने काम करून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एकता प्रशांत समर्थ आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार निवडुण आणण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करू असे आश्वासन दिले आणि त्यानुसार कामाला सुध्दा लागले आहेत. Mul Municipal Council









