मूल-चिचाळा मार्गावरील घटना
मूल (प्रतिनिधी): थेरगांव येथे जात असलेल्या दुचाकी स्वारांना ताडाळा कडुन मूलकडे येत असलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी दुपारी 3 वाजता दरम्यान घडली. मुन्ना पोरते वय 35 वर्षे व अनिल मडावी वय 37 वर्षे रा. थेरगांव असे अपघातात ठार झालेल्या युवकांचे नांव आहे. Accident
मूल तालुक्यातील मौजा थेरगांव येथील मुन्ना पोरते वय 35 वर्षे व अनिल मडावी वय 37 वर्षे रा. थेरगांव हे मूल येथे काही कामानिमीत्य दुचाकी क्रं. एम एच 34 बी पी 9035 ने आले होते, काम करून परत जात असतांना मूल-चिचाळा मार्गावरील महाबीज केंद्राजवळ चारचाकी वाहन क्रं. एम एच 34 बी झेड 3323 या वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकी चालक व वाहक जागीच ठार झाले. चारचाकी वाहन चालकाने आपले वाहन घटनास्थळावरून वाहन घेवुन फरार झाले. घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशन येथे मिळताच पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी घटनास्थळ गाठुन घटनेचा पंचनामा केला, व मृतकांचे शव उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. Munna Porte, Anil Madavi
मूल पोलीसांनी तांत्रिक पध्दतीने चारचाकी वाहनाचा शोध घेवुन वाहन जप्त करण्यास मूल पोलीसांना काही वेळातच यश आलेले आहे. मूल पोलीस स्टेशन येथे आरोपीवर गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड, सहा. पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. अंमलदार केळझरकर करीत आहे. Mul Police Station







