विद्यार्थीदशेपासुनच निलेश राय यांच्यात आहे नेतृत्वगुण Nilesh Ray

Nilesh Ray
Nilesh Ray

मातोश्री रजनी रायकंटीवार यांना अपक्ष उमेदवार म्हणुन निवडुण आण्यास यश

मूल (प्रतिनिधी) : महाविद्यालयील जिवनात वेगवेगळया स्पर्धेच्या माध्यमातुन महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या  निलेश राय यांच्यात विद्यार्थीदशेपासुनच नेतृत्वगुण आहे, त्यांनी मूल नगर पालीकेच्या निवडणुकीत मातोश्री रजनीताई देवराव रायकंटीवार यांना अपक्ष उमेदवार म्हणुन निवडणुक रिंगणात उभे करून निवडुण आणले होते. त्यांच्यात असलेल्या यानेतृत्व गुणाचा फायदा निलेश राय यांना 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या मूल नगर पालीकेच्या निवडणुकीत होईल अशी चर्चा आता प्रभागात सुरू आहे.

जिद्द, चिकाटी आणि अभ्यासुवृत्ती असलेल्या निलेश रायकंटीवार यांनी सन 2018 मध्ये रायकंटीवारच्या ठिकाणी राय असा आडनावात बदल केलेला होता, त्यांनी निवडणुकीचा अर्ज राय याआडनावानेच भरून आडनावाच्या बदलासंबधाने त्यांनी राजपत्र सुध्दा जोडलेले आहे, मात्र कॉंग्रेसचे उमेदवार राहुल प्रेमलवार यांनी मतदार यादीत रायकंटीवार असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडे केली होती, त्यामुळे सदर प्रकरण न्यायालयात दाखल केल्याने काही काळ प्रभागातील निवडणुक, निवडणुक आयोगाने स्थागित केलेली होती. दरम्यान प्रभाग क्रं. 10 ब गटाची निवडणुक 20 डिसेंबर रोजी होवु घातली आहे. याप्रभागात भाजपाकडुन निलेश राय, कॉंग्रेसकडुन राहुल प्रेमलवार तर वंचित बहुजन आघाडीकडुन भिमराव इटकेलवार हे निवडणुक रिंगणात उभे आहेत.

नेहमी वार्डातील समस्येसाठी तत्पर असलेला चेहरा म्हणुन निलेश राय यांच्याकडे बघीतले जाते, आरोग्याच्या समस्या असो कि कोणाच्या घरी दुखद घटना घडल्यास निलेश राय जावुन मदत करीत असल्याने त्यांची उमेदवारी चांगलीच चर्चेत आहे, प्रभाग क्रं. 10 मधुनच त्यांची मातोश्री रजनीताई रायकंटीवार हया अपक्ष म्हणुन निर्वाचीत झाल्या होत्या, त्या काही काळ सभापती म्हणुन पदभार साभाळुन उल्लेखनिय कार्य केलेल्या आहेत. निलेश राय हे महाविद्यालयात शिक्षण घेत असतांनाही कर्मविर महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन निवडणुक लढवित होते, त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व सुध्दा केलेले आहे. त्यांच्यात असलेल्या सामाजिक कार्याच्या गुणामुळे त्यांनी प्रभाग क्रं. 10 मधुन भारतीय जनता पार्टी कडुन निवडणुक लढविण्याचा निर्धार केलेला होता, भारतीय जनता पक्षानेही त्यांच्यावर विश्वास ठेवुन उमेदवारी दिलेली आहे. सध्यातरी निलेश राय यांचे याप्रभागात पारडे चांगलेच जड असल्याचे दिसुन येत आहे.