प्रभागा 10 ब ची निवडणुक
मूल (प्रतिनिधी) : माजी मंत्री तथा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे विश्वासु समजल्या जाणारे निलेश देवराव राय हे मूल नगर पालीकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रं. 10 ब मधुन भारतीय जनता पार्टीकडुन निवडणुक लढवित आहेत. उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे मात्र राय यांनी प्रचारात घेतलेली आघाडी सर्वांना घाम फोडत आहे, याप्रचारानुसार त्यांचा विजय निश्चीत मानल्या जात आहे. Nilesh Ray
मूल नगर पालीकेच्या प्रभाग क्रं. 10 ब ची निवडणुक न्यायालयीन प्रक्रियेमुळे 20 डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी भारतीय जनता पार्टीकडुन निलेश राय, कॉग्रेसकडुन राहुल प्रेमलवार तर वंचित बहुजन आघाडीकडुन भिमराव इटकेलवार निवडणुक रिंगणात उभे आहेत. याप्रभागातील समस्यांची जाण असलेल्या निलेश राय यांच्या मागे मोठा जनाधार असल्याने ही निवडणुक त्यांच्यासाठी फायदेशीर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मूल नगर पालीकेची निवडणुक 2 डिसेंबर रोजी पार पडली, केवळ प्रभाग क्रं. 10 ब ची निवडणुक कॉंग्रेसचे उमेदवार राहुल प्रेमलवार यांनी भाजपाचे उमेदवार निलेश राय यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेल्या आक्षेपामुळे निवडणुक 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यासाठी कॉंग्रेस-भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवार निवडुन आणण्यासाठी रॅली, सभा घेवुन मतदारांचे लक्ष वेधुन घेत आहेत. ही निवडणुक प्रत्येक पक्षासाठी अतिशय प्रतिष्ठेची मानली जात आहे. रूग्णसेवा, विवाहसोहळा आणि सामाजिक कार्यात नेहमीच सक्रीर्य राहत असलेल्या निलेश राय यांच्याप्रती मतदारामध्ये आपलेसेपणा दिसून येत आहे. राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकासकामांमुळे प्रभागातील मतदारही भाजपाप्रती आनंदी आहेत, त्याचा फायदा भाजपा उमेदवार निलेश राय यांना मिळेल असे सध्यातरी प्रभागात दिसुन येत आहे.








