नगरसेविका प्राची आक्केवार यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
मूल (प्रतिनिधी): गांधी चौकातील आरोग्य विभागाच्या जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एका इमारतीला बुधवारी रात्रौच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. क्षणातच आगीने रुद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मूल नगर परिषदेच्या नगरसेविका प्राची आक्केवार यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशमन यंत्रणेला पाचारण केले. Fire at old health department building
मूल नगर पालीकेच्या अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आपदग्रस्त इमारतीच्या बाजुला फुटपाथ व्यवसायीक आपला व्यवसाय थाटुन उदरनिर्वाह करीत आहे, नगरसेविका प्राची आक्केवार यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले नसते तर आग रूद्ररूप धारण करण्याची शक्यता होती, सदर आगीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. Mul
या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांनी अशा घटनांपासून बचावासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सदर आग लावण्यात आली की लागली याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत असुन याबाबत चौकशी करण्याची नितांत गरज आहे. प्रशासनाने त्यादिशेनेही चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. Fire Department









