………. हा तर राजकीय सुळबुध्दीने विज पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार Mul Municipal Council

Mul Municipal Council
Mul Municipal Council

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही: नगराध्यक्ष एकता समर्थ

मूल (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीची नगर पालीकेमध्ये सत्ता होती, त्यानंतर प्रशासकामार्फत साडेचार वर्षे नगर पालीकेचा कारभार सुरू होता, यादरम्यान विज वितरण कंपनीकडुन विज बिल थकीत असतानाही विज पुरवठा खंडीत केल्या गेली नाही, मात्र अडीच महिण्याच्या कार्यकाळात चारदा विज पुरवठा खंडीत केल्या गेल्याचा प्रकार विज वितरण कंपनीकडुन होत आहे, सदर प्रकार हा राजकीय सुळबुध्दीने सुरू असल्याचा घनाघाती आरोप मूलच्या नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ यांनी पत्रकार परिषदेत केला. मूल नगर परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. Power Supply Disrupted Due to Political Malice

Mul Municipal Council1
Mul Municipal Council1

मूल नगर पालीका निवडणुकीत जनतेनी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्षासह 18 नगरसेवक निवडुन दिले, 5 जानेवारी रोजी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे पदग्रहण समारंभ पार पडला, दरम्यान नगर पालीकेकडे 65 लाख रूपयाचे थकीत बिल होतेे, यामुळे पदग्रहण समारंभ पार पडल्यानंतर केवळ 3 दिवसात विज वितरण कंपनी जागी झाली आणि हरणघाट पंप हाऊस मधील विज पुरवठा खंडीत केलेे, याअडीच महिण्यात चारदा विज पुरवठा खंडीत करण्यात आलेले आहे, विज बिल भरणा केल्यानंतर विज पुरवठा सुरू करण्यात येत आहे. राजकीय सुळबुध्दीने विज पुरवठा खंडीत करण्याचा हा प्रकार निंदनिय असुन केवळ जनतेला त्रास देण्यासाठी केविलवाणा प्रकार सुरू असल्याची माहीती नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी यावेळी दिली. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष, पदाधिकारी आणि नगरसेवक कुठेच कमी पडणार नाही, नागरीकांनी सहकार्य करण्याची अपेक्षाही उपस्थित पदाधिकारी नगरसेवक यांनी केले. Mul Municipal Council President Ekta Samarth

Mul Municipal Council2
Mul Municipal Council2

सन 1970-71 यावर्षात उमानंदीच्या पात्रातुन मूल शहरातील जनतेला 2.70 लक्ष लिटर पाण्याचा पुरवठा नगर पालीका करीत होती, शहरातील लोकसंख्येचा विस्तारानुसार आता वैनगंगा नंदीपात्रातुन 14 किमी अंतरावरून दैनंदिन 40.50 लक्ष लिटर पाणी पुरवठा मूल शहरातील जनतेला करीत आहे. नागरीकांची पाण्याची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने मूल शहरात सार्वजनिक विहीर 42, हातपंप 300 आहेत, खाजगी विहीर 641 तर पाण्याची टॅंकर 1 उपलब्ध असल्याची माहिती नगराध्यक्ष एकता समर्थ, उपाध्यक्ष राकेश रत्नावार, पाणी पुरवठा सभापती विलास कागदेलवार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, शिक्षण सभापती ललिता फुलझेले, महिला व बालकल्याण उपसभापती समिक्षा कडस्कर यांनी दिली. यावेळी नगरसेवक अशोक येरमे, विवेक मुत्यलवार, राहुल प्रेमलवार, स्विकृत नगरसेवक गुलाब पठाण, नगरसेविका ज्योती चटारे, काजल धारणे, उज्वला कामडी, सुशिला खोब्रागडे उपस्थित होते. Press Conference