मूल शहरात मालधक्का नकोच : नगर पालीकेचा सर्वानुमते ठराव Pollution

Pollution
Pollution

नप पदाधिकारी नगरसेवकांचे जनतेचे मानले आभार

मूल (प्रतिनिधी) : मूल शहरालगत प्रस्तावित मालधक्का होवु यासाठी मूल शहर बचाव संघर्ष समितीने नगर पालीकेला निवेदन देवुन ठराव घेण्याची मागणी केली होती, सदर मागणीची दखल घेवुन मूल नगर पालीकेने 9 एप्रिल रोजी नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची सभा बोलावुन प्रस्तावित मालधक्का प्रकल्पास मूल नगर पालीकेने विरोध दर्शवुन लोकहित आणि शहर हिताचा विचार करून शहरालगत मालधक्का प्रकल्पास नगर परिषद नाहरकत प्रमाणपत्र देणार नसल्याचे ठरविण्यात आले. सदर ऐतिहासीक ठराव नगर पालीकेने मंजुर केल्याबद्दल मूल शहर बचाव संघर्ष समितीने नगर पालीका पदाधिकारी, नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले, व नगर पालीकेसमोर फटाके फोडुन आंदोत्सव साजरा केला. Municipal Council

मूल रेल्वे स्थानकावर प्रस्तावित मालधक्का उभारून सुरजागड येथील लोहखनिजाची देशभर वाहतूक करण्याची योजना सुरू आहे. या योजनेसाठी काही राजकीय नेत्यांकडून मदत केली जात असल्याचा आरोप असून, या पार्श्वभूमीवर मूल शहर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मालधक्का हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामोहीमेअंतर्गत मूल नगर परीषदेला निवेदन ठेवुन मूल येथील मालधक्का प्रकल्पास नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येवु नये अशी विनंती केली होती. मालधक्क्यामुळे मूल शहराला जलप्रदूषण, वायुप्रदूषण व ध्वनीप्रदूषणाच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. परिणामी, सध्या स्वच्छ आणि विकसित शहर म्हणून ओळख असलेले मूल शहर प्रदूषित शहर म्हणून ओळखले जावु शकते, शहरात अवजड वाहनांची रोजी वाहतुक होवुन अपघाताची शक्यता वाढण्याची शक्यता आहे.

सुरजागड परिसरातून होणाऱ्या लोहखनिज वाहतुकीदरम्यान बारीक धूळ आणि रासायनिक घटक हवेत व जमिनीवर पसरून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊ शकते. त्यामुळे परिसर लालसर होण्याची आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली, शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी मूल नगर परीषद क्षेत्रात किंवा शहरालगत मालधक्का प्रकल्पासाठी मूल नगर पालीका नाहरकत प्रमाणपत्र देणार नाही, यामुळे मालधक्का प्रकल्पास मूल नगर पालीका तिव्र विरोध करीत असुन नगर पालीकेने सर्वानुमते ठराव मंजुर केलेले आहे. Water Pollution, Air Pollution, and Noise Pollution

सदर ऐतिहासीक ठराव मूल नगर पालीकेने पारीत केल्याबद्दल मूलच्या जनतेनी नगर पालीकेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांचे आभार मानले आहे.