संगणक परिचालकांसाठी पद निर्मिती करून ग्रामपंचायतीच्या कर्मचारी आकृतीबंधामध्ये समावेश करणार !

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई :: संगणक परिचालकांसाठी पद निर्मिती करून ग्रामपंचायतीच्या कर्मचारी आकृतीबंधामध्ये समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन असून तसे संगणक परिचालक संघटनेला कळवले आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

त्यावेळी मुंबई येथील आझाद मैदानावर मोठ्या स्वरुपात आंदोलन करण्यात आले होते. मागण्या मान्य होत नसल्याने त्यावेळी आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले होते. मात्र, तात्पुरते आश्वसन मिळाले. अद्यापही ठोस निर्णय झाला नव्हता. त्यामुळे प्रचंड असंतोष खदखदत होता. डिजिटल महाराष्ट्र करण्यात संगणक परिचालकांचा मोठा वाटा आहे. मात्र, त्यांना अद्यापही आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी शासन दरबारी उंबरठे झिजवावे लागत आहे.

दरम्यान, संगणक परिचालकांसाठी पद निर्मिती करून ग्रामपंचायतीच्या कर्मचारी आकृतीबंधामध्ये समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन असून तसे संगणक परिचालक संघटनेला कळवले आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. राज्यातील संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेण्याबाबत सदस्य सुरेश धस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून संगणक परिचालक •आपल्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मागण्यासंदर्भात सकारात्मक भूमीका घेऊन आश्वस्त केले होते.