नवेगांव भुजला येथे सावित्रीबाई जन्मोत्सव उत्साहात साजरा

युवा परिवर्तन संघटनेचा उपक्रम
मूल : तालुक्यातील नवेगाव भूजला येथे युवा परीवर्तन संघटनेच्या वतीने सावित्रीबाई जन्मोत्सवानिमित्य विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलें होतें.

कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणुन यशदाचे मार्गदर्शक प्रा. दिलीप सोळंके, मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डॉ. मयूर कळसे, मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पाटील चुधरी, अनिलसचे जिल्हा संघटक प्रा. अनिल दहेगावकर, नवेगांव भुजलाचे उपसरपंच प्रोफेसर सतरे, बोंडाळाचे सरपंच मुर्लीधर चुधरी, जुनासुर्लाचे सरपंच रंजीत समर्थ उपस्थित होते..

यावेळी संपुर्ण गावात ग्रामस्वच्छता,, नागरीकांचे रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात आली, स्त्रियांसाठी रांगोळी स्पर्धा, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वितरण व व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.

मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सर्वाजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यासोबतच रांगोळी स्पर्धेचे बक्षिस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. रागोळी स्पर्धेतै. स्नेहा हिराजी चुदरी, शोभा विलास घोगरे यांना अनुक्रमे प्रथम आणि व्दितीय क्रमांकाचे पारोतोषिक वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचं संचालन गणेश आरेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिन घोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी युवा परीवर्तन संघ्ज्ञटनेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.