भीषण कार अपघातात 7 युवक ठार

  1. वाढदिवस साजरा करूण परत येत असतानाची घटना

वर्धा (प्रतिनिधी) : मित्राचा वाढदिवस साजरा करून परत येत असताना वर्धा तुळजापूर मार्गावर देवळी नजीकच्या सेलसुरा गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला. झायलो कार यवतमाळ येथून नागपूरला जात असताना पुलाच्या खाली कोसळली. या गाडीमधील सात ही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्रीला दीड वाजताच्या सुमारास भरधाव कारच्या समोरून वन्यप्राणी आडवा गेल्याने प्राण्याला वाचवण्याचा नादात चालकाचे नियंत्रण सुटून पुलाच्या खाली वाहन कोसळल्याने अपघात झाला.

वर्धा सावंगी रुग्णालयात मेडिकलचे शिक्षण घेत होते. यात नीरज चव्हाण, आविष्कार विजय रहांगडाले, नितेश सिंग, विवेक नंदन, प्रत्युश सिंग, शुभम जयस्वाल, पवन शक्ती यांचा समावेश होता. सदर विध्यार्थी हे सावंगी येथील मेडिकल विद्यालयात शिक्षण घेत होते. यातील एका मित्राचा वाढदिवस असल्याने वाढदिवस साजरा करण्याकरिता यवतमाळ येथे गेले होते, परत येताना अपघात सातही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

सात विद्यार्थ्यांमध्ये एका विद्यार्थ्यांचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी यवतमाळ येथे गेले असल्याची सूत्रांकडून माहिती देण्यात आली. परत येताना या अपघातात दुर्दैवी 7 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सदर अपघातात आमदार विजय रहांगडाले यांच्या एकुलता एक सुपुत्राचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.