भद्रावतीचे कलाकार महेश मानकर यांचे जगभरात कौतुक

३० देशांमध्ये कार्यशाळा आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधित्व केले

अतुल कोल्हे भद्रावती :  महाराष्ट्रातील भद्रावती येथे बालपण घालवलेल्या महेश यांनी प्राचीन जैन मंदिरे, बौद्ध लेणी आणि शिव आणि विष्णू यांना समर्पित प्राचीन मंदिरांमध्ये केलेल्या आकृत्या आणि रंगसंगतीचा जो प्रभाव पडला होता, तो त्यांच्या कलाकृतींमध्ये दिसून येतो. एम.एफ.ए. करून नागपूर विद्यापीठातून सुवर्णपदक मिळवलेल्या महेशचे परदेशातही कौतुक  झाले.

आतापर्यंत त्यांनी २५ ते ३० देशांमध्ये कार्यशाळा आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्यांनी रशियामध्ये कार्यशाळा, मास्टर क्लासेस, ग्रुप आणि एकल कला प्रदर्शनांचे आयोजन केले आहे.

चित्र ही एक अशी अभिव्यक्ती आहे ज्याचे शब्द रेषा आणि रंग आहेत आणि ते शब्द वाचून डोळे आणि मन कलेच्या प्रकाशाने चमकते. ज्या भावना कलाकार बोलून व्यक्त करू शकत नाहीत, त्यासाठी तो आकृत्यांची मदत घेतो. या आकृत्या कधी मूर्त, कधी अमूर्त तर कधी या दोन्हींचा सुंदर मिलाफ असते. गेल्या दोन दशकांपासून हा सुंदर संजोग आपल्या सर्जनशील कार्यात उतरवण्याचे काम भद्रावतीचे कलाकार महेश महादेव मानकर करत आहेत.

कलेचा संबंध मन आणि बुद्धी या दोन्हींशी असतो, ही गोष्ट त्यांच्या कामात स्पष्टपणे दिसून येते, ज्यामध्ये त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की एकतर व्यक्ती समाजाला मूर्ख बनवते किंवा इतरांना मूर्ख बनवते. पण या दोन्ही परिस्थिती शब्दात मांडता येणार नाहीत. मूर्खपणाचे हे नमुने कधी कॅनव्हासवर तर कधी ड्रॉइंग शीटवर या आकृत्यांमधून आणि रंगांनी व्यक्त होतात. किंबहुना त्यांची चित्रे सहन करण्यापासून ते सांगण्यापर्यंतच्या काळातील कथा आहेत. त्यांनी याआधीच जलरंग कलाकाराची प्रतिमा आपल्या निर्मितीने मजबुत केली आहे आणि आता ऍक्रेलिक, चारकोल आणि मिक्समीडियाच्या माध्यमातून निर्माण करून आणखी एक ओळख निर्माण करत आहे. एकेकाळी गुहांच्या भिंती आणि मंदिरांचे खांब सुशोभित करणाऱ्या त्या काळाची धूसर छापही त्याच्या कामात दिसते.

आर्टमेटच्या वतीने या प्रतिभावंत कलाकार महेश महादेव मानकर यांना कला प्रवासासाठी हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच भद्रावती शहराचे नाव जगभरात गौरविण्या करिता संपुर्ण भद्रावती शहरातुन कौतुक आणि शुभेच्छा देण्यात येत आहे.