सोनेगांव बेगड़े येथील वाघ हमला प्रकरण
प्रमोद मेश्राम चिमूर
चिमुर परिसरातील सोनेगांव बेगड़े येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाच्या नातेवाईकास 5 लाख रूप्याच्या सानुग्रह निधीचे धनादेश वनविभाग चिमुरच्या मार्फतीने देण्यात आला.
चिमुर परिसरातील सोनेगांव बेगड़े येथील वाघाच्या हल्ल्यात 17 डिसम्बर 2021 रोजी मृत्युमुखी पडलेल्या देवीदास महादेव गायकवाड़ वय 40 वर्ष यांचे वारस त्यांची आई लक्ष्मीबाई महादेव गायकवाड़ यांना 31 जानेवारी 2022 रोजी सानुग्रह निधी 5 लाख रूप्याचा धनादेश चिमुर प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी यू एस नैताम, ट्री फाउंडेशन चिमुरचे अध्यक्ष मनीष नाईक यांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी क्षेत्र सहाय्यक रमेश नरड़, वनरक्षक ए,एस मेश्राम, आर डी नैताम, के,डी, गायकवाड़, पोतराजे, सहारे उपस्थित होते,