दुचाकी वाहणाची समोरासमोर धडक

एक जण जागीच ठार : 2 जण गंभीर जखमी 

वरोरा (प्रतिनिधी) :  नागपूर  वरून चंद्रपूरला जात असलेल्या व विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकी वाहनामध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात 1 जण जागीच ठार झाला तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना वरोरा शहरातील सहकार नगर येथे बुधवारी सायंकाळी घडली. मधुकर राऊत रा. एकर्जूना हे जागीच ठार झाले तर शशांक सिंग आणि अथर्व माधव शेट्टी हे गंभीर जखमी झाले.

चंद्रपूर येथील शशांक सिंग  वय 18 वर्ष आणि अथर्व माधव शेट्टी वय 20 वर्ष हे दुचाकी क्र. एम एच 29 बी यु 8834 या  अॅक्टिवा वाहणाने नागपुर वरून चंद्रपूर कडे जात असताना वरोरा शहरानजीकच्या नागपूर चंद्रपूर मार्गावरील सहकार नगर जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या mh-31 आर 4310 या दुचाकीने वळणावरून अॅक्टिवा ला धडक दिली त्यात दुचाकी वाहनावरील मधुकर राऊत राहणार एकर्जूना हे जागीच मृत्यू झाले तर शशांक सिंग आणि अथर्व माधव शेट्टी गंभीररित्या जखमी झाले.

जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.