सोनल मडावी यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड

मूल (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या मार्फतीने सामाजीक कार्य करणाऱ्या सोनल उसेकर मडावी यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या बल्लारपूर विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

मूल तालुक्यातील चितेगांव येथील सोनल उसेकर मडावी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन ग्रामीण भागात अनेक वर्षापासुन सामाजिक कार्य करीत आहे, केलेल्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने त्यांच्याकडे बल्लारपूर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

सदर नियुक्ती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या सुचनेवरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केली.

सदर नियुक्ती मुळे मूल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष सोनल मडावी यांच्या नियुक्तीबद्दल गंगाधर कुनघाडकर, गुरूदास गिरडकर, नंदु बारस्कर, महेश चौधरी, महिला तालुकाध्यक्ष निताताई गेडाम, महिला शहराध्यक्ष अर्चनाताई चावरे, विक्रांत मोहुर्ले, आशिष  वाकुडकर यांनी अभिनंदन केले.