Home Breaking News तळोदि बाळापूर येथे दिवसाढवळ्या खूण

तळोदि बाळापूर येथे दिवसाढवळ्या खूण

भावाणे भावाचा केला खून

नागभिड प्रतिनिधी:- नागभिड तालुक्यातील तळोधी बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत तळोदि बा. येथील झेंडा चौक येथे आज भावानेच पूर्ववैमनस्यातून मोठ्या भावाचा दिवसाढवळ्या निर्घृण खून केल्याची घटना घडली.

मृतक राजेश्वर भिवाजी जुमडे (६५) याचा खून त्याच्याच लहान भाऊ बंडू भिवाजी जुमडे(६२) याने केल्याची घटना आज दुपारी १२:३० ला उघडकीस आली. हा खून त्याने दगडाने डोका ठेचून केला असून राजेश्वर चे घटनास्थळी मृत्यू झाले.

सदर घटनेची माहिती मिळताच तळोधी बाळापूर येथील ए.पी.आय, डि.आर. शेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली, मोक्का पंचनामा करून शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आले. अधिक तपास पि.एस.आय, आकाश कुमार साखरे, सहाय्यक फौजदार बलदारखा पठान, हवालदार पानसे, हवालदार आंबेकर, पो.कांस्टेबल निंबेकर इतर,हे करीत आहेत.

error: Content is protected !!