रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय आणि माऊंट विज्ञान महाविद्यालय सावली येथे शिवजयंती साजरी

सावली प्रतिनिधी:- रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय आणि माऊंट विज्ञान महाविद्यालय सावली येथे आज दिनांक १९/२/२०२२ रोजी ठीक ८.१५ वाजता संचालक मंडळ, शाळेचे सर्व शिक्षक , प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे उपस्थितीत मान. के.एन. बोरकर साहेब अध्यक्ष यांचे शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले,

याप्रसंगी विद्यालयाचे कर्तव्यदक्ष शिक्षक एच. आर. कस्तूरे सर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर प्रकाश टाकून शिवरायांच्या विचारांची देशाला कीती गरज आहे हे पटवून दिले

अध्यक्षस्थानावरुन बोलतांना के.एन बोरकर साहेब म्हणाले की, जीजामातेकडून मीळालेले संस्कार आणि शिकवण तसेच जिवाला जिव देणारे लाभलेले सोबती,आपल्या अंगी असणारे बुध्दीचातुर्य,आपल्या समाजातील लोकांची भयावह स्थिती,आणि नाळ ओळखून खऱ्याअर्थाने रयतेचे राज्य चालविणारा जानता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.एन.मेश्राम सर यांनी केले.याप्रसंगी प्राचार्य एन.एल शेंडे, पर्यवेक्षक एम.डी.लाकडे,प्र. प्राचार्य पी.जी. रामटेके आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.