राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली च्या विद्यार्थ्यांची सीपेट ला भेट

सावली (प्रतिनिधी) : स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील एम.एस्सी. रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार च्या पेट्रोकेमिकल्स मंत्रालया द्वारे चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय पेट्रोकेमिकल्स व इंजिनीरिंग टेकनॉलॉजी संस्था चंद्रपूर या ठिकाणी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला.

यावेळी या सेंटर सोबत एक सामंजस्य करार करण्यात आला. दोन्ही संस्थांनी विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आणि त्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी वेगवेगळे कौशल्य विकास प्रोग्राम घेण्याचे व त्यातून रोजगार निर्मिती साठी प्रयत्न करण्याचे या करारानुसार ठरविण्यात आले. या एक दिवसीय ट्रेनिंग प्रोग्राम दरम्यान या संस्थेतील प्लास्टीक प्रोसेसिंग, प्लास्टिक टेस्टींग व विविध प्रयोग शाळेत वापरण्यात येणाऱ्या उपकरणां बद्दल प्रत्यक्षिका द्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील एम एस्सी रसायनशास्त्र व एम एस्सी भौतिकशास्त्र विषयातील एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी या संस्थे मध्ये उपलब्ध असलेल्या विविध कोर्से व उपकरणांची माहिती घेतली तसेच या संस्थेतील शिक्षक व अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करून मार्गदर्शन केले. प्रथम सत्रात समन्वयक शरथ यांनी विद्यार्थ्यांना या संस्थे मार्फत संपूर्ण देशात विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्या कोर्सेस विषयी व त्यासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती दिली.

दुसऱ्या सत्रात समन्वयक नावेद व निकम यांनी प्लास्टिक मटेरियल च्या टेस्टिंग बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात संदीप गराडे व दिलेबक्स लिहारे यांनी प्लास्टिक मोल्डिंग व त्यापासून वेवेगळ्या वस्तू कश्या बनवल्या जातात या वर प्रात्यक्षिक करून दाखवले. समारोप प्रसंगी सीपेट संस्थेचे अधिष्ठाता अवनीत जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भविष्यात प्लास्टिक चे महत्व लक्षात घेऊन आणि स्वयंरोजगारासाठी या संस्थेद्वारा चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संस्थे मार्फत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होवून स्वयंपूर्ण होण्याचे आवाहन केले. यावेळी सीपेट या संस्थेतील विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संदीप देशमुख, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. प्रेरणा मोडक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. हा प्रोग्राम घडवून आणण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथील प्राचार्य डॉ. ए.चंद्रमौली सर यांचे मार्गदशन व सीपेट चे पुष्कर देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.